Amazfit GTR 4 New झाले लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्ये

Amazfit GTR 4 New झाले लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्ये

Photo Credit: Amazfit

Amazfit GTR 4 New comes in Brown Leather and Galaxy Black colourways

महत्वाचे मुद्दे
  • Amazfit GTR 4 New स्वतंत्र संगीत प्लेबॅकला अनुमती देण्यास समर्थ आहे
  • हे स्मार्टवॉच वापरकर्त्यांना त्यांचे जीपीएस ठिकाण न चुकता शोधण्यात मदत
  • Amazfit GTR 4 New Zepp ॲपसोबत सुसंगत असणार आहे
जाहिरात

Amazfit या ब्रँडने त्यांच्या GTR सिरीजमधील Amazfit GTR 4 New हे स्मार्टवॉच बुधवार दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च करण्यात आले आहेत. चला तर मग बघुयात Galaxy Black आणि Brown leather या दोन प्रकारांमध्ये पडणाऱ्या दोन्ही स्मार्टवॉच ची किंमत, वैशिष्ट्ये आणि बरेच काही.

Amazfit GTR 4 New ची किंमत आणि उपलब्धता

Amazfit GTR 4 New GTR 4 New हे स्मार्टवॉच भारतात, 16,999 या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तुम्हाला देखील हे स्मार्टफोन खरेदी करायचे असतील, तर तुम्ही Amazfit आणि Amazon च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. हे स्मार्टवॉच स्टेनलेस स्टीलच्या केसमध्ये उपलब्ध आहेत.

Amazfit GTR 4 New ची वैशिष्ट्ये

Amazfit GTR 4 New या स्मार्टवॉचमध्ये 331 ppi चे रिझोल्यूशन असलेला 1.45 इंचाचा AMOLED डिस्प्ले बसविण्यात आला आहे, ज्यामुळे व्हिज्युअल्सची गुणवत्ता सुधारते. यामध्ये नेहमी ऑन राहणारा डिस्प्ले पर्याय देखील उपलब्ध आहे आणि जो वापरकर्त्यांना 150 पेक्षा जास्त घड्याळाच्या चेहऱ्यांची निवड करण्यास मदद करतो.

Amazfit GTR 4 New चे एक उत्कृष्ट वैशिष्ट्य म्हणजे Zepp Aura तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण. AI वैशिष्ट्यांचा लाभ घेत, Zepp Aura झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी डिझाइन केलेले अनुकूलीत आवाज व्युत्पन्न करते, तसेच तपशिलवार झोपेचे अहवाल सादर करण्याचे काम करतात. हे कार्य घड्याळाच्या 24 तास आरोग्य देखरेख क्षमतेसह अखंडपणे जोडले जातात. या आरोग्य वैशिष्ट्यांव्यतिरिक्त, स्मार्टवॉच ब्लूटूथ कॉलिंग आणि संगीत नियंत्रणास समर्थन सुध्दा देते, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या फोनमध्ये सतत प्रवेश करण्याची आवश्यकता भासत नाही आणि सतत कनेक्ट देखील राहता येते. हे स्मार्टवॉच अलेक्झा आणि ऑफलाइन व्हॉईस असिस्टंट सोबत सुसंगत आहेत.

Amazfit GTR 4 New त्याच्या GPS कार्यक्षमते सोबत h आणि 5 ATM वॉटर रेझिस्टन्स सोबतबाह्य क्रियाकलापांना तोंड देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे 150 हून अधिक स्पोर्ट्स मोडचे देखील समर्थन करते. त्यांपैकी 8 वैशिष्ट्ये आपोआप शोधली जाऊ शकतात तसेच फिटनेस उत्साहींच्या विस्तृत श्रेणीसाठी त्यांचा वापर होऊ शकतो. Amazfit GTR 4 New या स्मार्टवॉच मध्ये असलेल्या बॅटरी बद्दल बोलायचे ठरवले तर, यामध्ये देण्यात आलेली बॅटरी ही एकदा चार्ज केल्यानंतर 12 दिवसांपर्यंत चालण्यास समर्थ आहे.

Comments
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »