जाणून घ्या काय आहे किंमत नव्याने लॉन्च झलेल्या Apple AirPods 4 ची

या Apple AirPods 4 चे दोन प्रकार आहेत आणि दोघांच्याही किंमती वेगवेगळ्या आहेत

जाणून घ्या काय आहे किंमत नव्याने लॉन्च झलेल्या Apple AirPods 4 ची

Photo Credit: Apple

AirPods 4 (pictured above) have been launched as the successor to 2021's AirPods 3

महत्वाचे मुद्दे
  • Apple ने सोमवारच्या It's Glowtime कार्यक्रमात AirPods 4 लॉन्च केले
  • घालण्यायोग्य ऑडिओ उत्पादन आता ANC आणि अडॅप्टिव्ह ऑडिओसोबत येतात
  • Apple कडून AirPods 4 हे 20 सप्टेंबर 2024 पासून खरेदीसाठी उपलब्ध होणार
जाहिरात

सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी पार पडलेल्या Apple च्या it's Glowtime या कार्यक्रमात कंपनीने फक्त iPhone 16 ही मालिका लॉन्च केलेली नसून त्यासोबतच Apple AirPods 4 सुध्दा लॉन्च करण्यात आलेले आहेत. या AirPods चे दोन प्रकार आहेत आणि दोघांच्याही किंमती वेगवेगळ्या आहेत. चला तर मग पाहुयात, नव्याने लॉन्च झालेल्या Apple AirPods 4 ची किंमत, वैशिष्ट्ये आणि उपलब्धता.

Apple AirPods 4 ची किंमत आणि उपलब्धता

जसे की मी यापूर्वी सुद्धा म्हटले आहे, त्याप्रमाणे Apple AirPods 4 चे Active Noise Cancellation समाविष्ट असलेले आणि समाविष्ट नसलेले असे दोन प्रकार पडतात. या दोन्ही प्रकारांची किंमत वेगवेगळी आहे ज्यामध्ये ANC Apple AirPods 4 ची भारतातील किंमत 17,900 रुपये इतकी असून ANC नसलेल्या AirPods ची किंमत 12,900 रुपये इतकी आहे. हे AirPods खरेदी करण्यासाठी तुम्ही आजपासूनच प्रिऑर्डर करू शकता तसेच ऑनलाईन वेबसाईटवर 20 सप्टेंबर पासून खरेदी करू शकता.

Apple AirPods 4 ची वैशिष्ट्ये

नव्याने लॉन्च झालेल्या Apple AirPods 4 चे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामधील सुधारित ऑडिओ गुणवत्तेसह, कंपनीने अद्ययावत ध्वनिक आर्किटेक्चरमुळे अधिक समृद्ध बास आणि स्पष्ट उच्चतेचे दिलेले आश्वासन. या AirPods बाद Apple चे म्हणणे आहे की त्यांनी नवीन डिझाइनमध्ये आरामाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे आतापर्यंतचे सर्वात आरामदायक AirPods तयार करण्यासाठी हजारो कानाच्या आकारांचे विश्लेषण केल्याचा दावा देखील कंपनी करत आहे.

Apple AirPods च्या चौथ्या पिढी मध्ये H2 चिप समाविष्ट करण्यात आली आहे, जी वैयक्तिकृतपणे स्थानिक ऑडिओ आणि कॉलसाठी सुधारित व्हॉइस आयसोलेशन सारखी वैशिष्ट्ये देण्यास समर्थित आहे. AirPods 4 ला नवीन जेश्चर नियंत्रणे देखील देण्यात आली आहेत, ज्यामुळे वापरकर्ते आता कॉल उचलण्यासाठी किंवा सिरी प्रॉम्प्टला प्रतिसाद देण्यासाठी होकार देऊ शकतात किंवा डोके हलवू शकतात. त्यासाठी कोणत्याही विशिष्ट सेट्टींगची आवश्यकता नाही. हे AirPods तुम्ही ब्लू, मिडनाइट आणि स्टारलाईट अशा रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

ओपन इअर डिझाइन असूनही, Apple AirPods 4 पारदर्शकता मोड आणि अडॅप्टिव्ह ऑडिओ सोबत देखील देण्यात आले आहेत, जे वापरकर्त्याच्या वातावरणाशी आपोआप जुळवून घेतात. चार्जिंग केस एकदा चार्ज केल्यानंतर 30 तासांपर्यंत चालण्यास सक्षम आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Oppo Find X9 सीरीजच्या किंमतीत वाढ? लॉन्चपूर्वीच लीकने निर्माण केली चर्चा
  2. 1TB स्टोरेज आणि शक्तिशाली कॅमेरासह OnePlus Ace 6T लॉन्चसाठी सज्ज
  3. लॉन्चच्या काही दिवस आधी Vivo X300 सीरीजची किंमत व्हायरल; जाणून घ्या अपडेट्स
  4. लॉन्चच्या काही दिवस आधी Vivo X300 सीरीजची किंमत व्हायरल; जाणून घ्या अपडेट्स
  5. Poco F8 सीरीज भारतात 26 नोव्हेंबरला होणार सादर: किंमत, फीचर्स घ्या जाणून
  6. Galaxy S26 सिरीज कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पुन्हा समोर; नवीन लीक्समध्ये पूर्ण सेटअपची समोर आली माहिती
  7. OnePlus 15 नवीन जनरेशन प्रोसेसरसह आला भारतात; 7,300mAh बॅटरी आणि किंमतीचे अपडेट्स आले समोर
  8. itel A90 128GB लिमिटेड एडिशन भारतात लाँच; पहा फोनमध्ये काय आहे खास?
  9. OPPO Reno 15 व Reno 15 Pro भारतात लॉन्चसाठी होतोय सज्ज; पहा कॅमेरा ते रंगांपर्यंतची काय असू शकतात स्पेसिफिकेशन्स
  10. Poco F8 Ultra Geekbench वर दिसताच चर्चेला उधाण; स्कोअर पाहून चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »