अॅप्पलच्या इव्हेंटनंतर Watch Series 11 साठी प्री-ऑर्डर 12 सप्टेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर 19 सप्टेंबरपासून ही वॉच सीरीज खरेदीसाठी उपलब्ध होईल.
२०२२ मध्ये लाँच झालेल्या वॉच एसई २ च्या जागी अॅपल वॉच एसई ३ येईल अशी अपेक्षा आहे
Apple च्या 9 सप्टेंबर रोजी अमेरिकेत होणाऱ्या त्यांच्या आगामी “Awe Dropping” कार्यक्रमात iPhone 17 lineup सोबत Watch Series 11 आणि Watch Ultra 3 लाँच करून त्यांच्या स्मार्टवॉच लाइन-अपला रिफ्रेश करण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे. Bloomberg चे मार्क गुरमन यांच्या माहितीनुसार, Apple Watch Series 11 चे डिझाइन मागील मॉडेलसारखेच असेल. मात्र, या वेळेस जास्तीत जास्त ब्राइटनेससह डिस्प्ले अपग्रेड होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बाहेर सूर्यप्रकाशात घड्याळ वापरताना त्याची दृश्यमानता सुधारेल. तसेच, कंपनी नवीन रंग आणि पट्ट्यांचे पर्याय आणू शकतात. मागील वर्षीच्या Series 10 मधील Jet Black फिनिशवरील टिकाऊपणाच्या तक्रारी लक्षात घेऊन त्या समस्यांवरही उपाय केले जाऊ शकतात, असे MacRumors ने म्हटले आहे.
Apple Watch Series 11 हा मोठा बदल न ठरता केवळ छोटा अपग्रेड असेल, अशी शक्यता आहे. यात नवीन S11 चिप आणि 5G RedCap सपोर्टसह MediaTek मोडेम दिला जाईल. रक्तदाब मोजण्याचे फीचर येण्याची चर्चा असली तरी ते अद्याप लाँचसाठी तयार नसल्याचे मार्क गुरमन यांनी सांगितले आहे.
Series 11 साठी प्री-ऑर्डर 12 सप्टेंबरपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे आणि त्यानंतर 19 सप्टेंबरपासून उपलब्धता होईल.
नवीन लीकनुसार Apple Watch Ultra 3 मध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले असू शकतो. iOS 26 मधील कोडनुसार या मॉडेलमध्ये हाय रिझोल्यूशन पॅनेल, स्लीम बेझल्स आणि अधिक आकर्षक डिझाइन मिळेल. यामुळे बाहेर वापरताना दृश्य स्पष्टता वाढेल तसेच माहितीप्रधान वॉच फेससाठी अधिक जागा उपलब्ध होईल.
अंतर्गत हार्डवेअरमध्ये Ultra 3 साठी सुधारित S10 चिप किंवा नवीन S11 चिप वापरली जाऊ शकते, ज्यामुळे मोठी बॅटरी किंवा अतिरिक्त सेन्सर्ससाठी जागा मिळू शकते. याशिवाय, या मॉडेलमध्ये नवीन LPTO3 OLED डिस्प्ले तंत्रज्ञानाचा वापर होणार असून त्यातून सहज अॅनिमेशन्स आणि सुधारित always-on performance मिळेल.
Apple च्या सप्टेंबर इव्हेंटमध्ये iPhone 17 सिरीज आणि इतर हार्डवेअर अपडेट्स सादर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, Watch संदर्भातील घोषणा कंपनीच्या वेअरेबल्समध्ये आरोग्य, टिकाऊपणा आणि कार्यक्षमतेवर सुरू असलेले लक्ष अधोरेखित करू शकतात.
जाहिरात
जाहिरात