तुम्ही देखील आहात तणावग्रस्त का? मग ही घ्या Boat Smart Ring Active आणि व्हा तणावमुक्त.

स्टेनलेस स्टील ने बनवलेली ही आकर्षक Boat Smart Ring Active बोटांवर आहे की नाही हेच लक्षात येत नाही. 20 जुलै पासून ही रिंग तुम्ही फक्त 2,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

तुम्ही देखील आहात तणावग्रस्त का? मग ही घ्या Boat Smart Ring Active आणि व्हा तणावमुक्त.

Photo Credit: Boat

महत्वाचे मुद्दे
  • Boat Smart Ring Active खरेदी करा, फक्त 2,999 रुपयांमध्ये.
  • 20 जुलै पासून अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर सुद्धा उपलब्ध होणार आहे.
  • Boat Smart Ring Active तीन आकर्षक रंगांमध्ये आणि 5 आकारांमध्येही उपलब्ध आ
जाहिरात
सॅमसंगला टक्कर देण्यासाठी boAt ने एक अशी रिंग मार्केट मध्ये आणली आहे, जी स्मार्ट तर आहेच पण सर्वांना परवडणारी सुद्धा आहे. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर, Boat smart ring active मध्ये पाच दिवस चालणारी बॅटरी, हृदयाच्या गतीची निरीक्षण करण्याची, 20 पेक्षा जास्त खेळांवर लक्ष ठेवण्याची क्षमता आहे. त्यासोबतच वजनाने हलकी, स्टेनलेस स्टील ने बनवलेली आकर्षक रिंग बोटांवर आहे की नाही हेच लक्षात येत नाही. चला तर मग बघुयात, ह्यावेळी boAt ने अशा कोणत्या वैशिष्ट्यांसह ही रिंग बनविलेली आहे, जी प्रतिस्पर्ध्यांना सुद्धा मागे टाकत आहे.

Boat Smart Ring Active ची किंमत आणि उपलब्धता.


जर अगदी परवडणाऱ्या दरात Boat Smart Ring Active मिळणार असेल तर ती खरेदी करण्यासाठी तुम्ही सुद्धा उत्सुक असणारंच. 20 जुलै पासून ही रिंग boAt च्या अधिकृत वेबसाईट सोबतच फ्लिपकार्ट आणि अमेझॉन वर देखील अगदी कमी किंमतीत म्हणजेच फक्त 2,999 रुपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येऊ शकते. 

Boat Smart Ring Active ची वैशिष्ट्ये. 


•    Boat Smart Ring Active ही तुमच्या दिवसभरातील हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधित माहितीचा मागोवा ठेवते.

•    त्यासोबतच ही रिंग तुमचे श्वसन आरोग्य आणि तणाव पातळी ही समजून घेण्यास मदत करते. 

•    तुमच्या तणाव पातळीचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होत आहे किंवा तुमच्या उत्तम आरोगयासाठी तुमच्या तणाव पातळी बद्दल जागरूक ठेवण्याचे काम सुद्धा करते. 

•    Boat Smart Ring Active तुमच्या झोपेचंही बारीक निरीक्षण करते आणि तुम्ही किती वेळ झोप घेतली आहे, किती वेळ घ्यायला हवी याचं अचूक मार्गदर्शनही करते. 

•    रिंग चार्ज करण्याचाही तुम्हाला फार त्रास होत नाही कारण रिंग सोबत मिळालेली केस ही चुंबकीय चार्जिंग सोबत कुठेही नेण्यास सोपी आहे. आता फक्त केस मध्ये रिंग टाका आणि चला. 

•    Boat Smart Ring Active ची बॅटरी ही तिच्या नावाप्रमाणेच सक्रिय असल्याने एकदा चार्ज केल्यावर पाच दिवस चालते.

•    ह्या रींगचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अगदी थोड्याशा हालचालीने सुद्धा ह्या रींगच्या मदतीने फोटो काढला जाऊ शकतो. 

•    ही रिंग मिडनाईट ब्लॅक, रेडियंट ब्लू आणि गोल्ड अशा तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

•    त्यासोबतच ही रिंग 7, 8, 9, 10 आणि 11 ह्या 5 आकारांमध्ये देखील खरेदी केली जाऊ शकते.

•    Boat Smart Ring Active ही धूळ, घाम आणि पाणी प्रतिरोधक आहे. 

तुम्ही ही रिंग विकत घेणार आहात की नाही, आणि ही वापरून तुमचा अनुभव कसा आहे हे आम्हाला अवश्य कळवा.
 
Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  2. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  3. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  4. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
  5. Samsung चा Galaxy Unpacked 2025 होणार 9 जुलैला; Foldables येणार ग्राहकांसमोर
  6. Vivo Unveils X200 FE मध्ये काय आहेत खास फीचर्स? भारतात लॉन्च कधी? घ्या जाणून अपडेट्स
  7. Nothing Phone 3 मध्ये पहा कॅमेरा बद्दलचे अपडेट्स; 50MP Triple Camera System असणार
  8. Oppo Reno 14 5G स्मार्टफोन लवकरच Amazon, Flipkart द्वारा भारतातही येणार; झलक आली समोर
  9. OnePlus चा नवा नेकबँड भारतात लाँच; एका चार्ज मध्ये तब्बल 36 तास चालणार, विक्री 24 जूनपासून
  10. Samsung Galaxy M36 5G ची भारतातील लॉन्च डेट जाहीर; डिझाइन लीक आधीच समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »