Huawei च्या नव्या स्मार्टबॅन्डची घोषणा; पहा फीचर्स आणि स्पेशल प्राईज काय?

17 जानेवारीपासून फ्लिपकार्ट वर Huawei Band 9 विक्रीसाठी खुला होणार आहे

Huawei च्या नव्या स्मार्टबॅन्डची घोषणा; पहा फीचर्स आणि स्पेशल प्राईज काय?

Photo Credit: Flipkart

Huawei Band 9 मध्ये 2.5D वक्र AMOLED स्क्रीन आहे

महत्वाचे मुद्दे
  • Huawei Band 9 ची भारतामधील स्पेशल प्राईज 3999 रूपये
  • स्मार्ट वॉच मधील सेंसर मध्ये Accelerometer, Gyroscope,आणि Optical Hear
  • Huawei Band 9 मध्ये 100 पेक्षा अधिक वर्कआऊट मोड्स आहेत
जाहिरात

Huawei Band 9 ची भारतामध्ये घोषणा झाली आहे. जुलै 2024 मध्ये आलेल्या Huawei Band 8, चा हा उत्तराधिकारी आहे. या स्मार्ट वेअरेबल मध्ये 2.5D AMOLED screen आहे. यामध्ये Always-On-Display (AOD) आहे. हेल्थ आणि फीटनेस ट्रॅकिंग, स्लीप, स्ट्रेस, ब्लड ऑक्सिजन लेव्हल, हार्ट रेट ट्रॅक केले जाते. स्मार्ट वॉच मध्ये स्विमिंग मोड देखील आहे ज्यात स्ट्रोक्स, लॅप्स आणि परफॉरमन्स यांचे ट्रॅकिंग केले जाते.

Huawei Band 9 ची भारतामधील किंमत 3999 आहे. ही स्पेशल प्राईज आहे. या बॅन्डची किंमत 5999 आहे. 17 जानेवारीपासून फ्लिपकार्ट वर हा स्मार्टबॅन्ड विक्रीसाठी खुला असेल. काळा, गुलाबी, पांढरा आणि पिवळा रंगामध्ये हा स्मार्टबॅन्ड उपलब्ध असणार आहे.

Huawei Band 9 मध्ये 1.47 इंचाची आयताकृती touch-supported AMOLED screen आहे. हे स्मार्टवॉच 194 x 368 pixels resolution सह आहे. हे घड्याळ Android आणि iOS devices सोबत जोडलेले आ हे. यामध्ये Bluetooth 5.0 चा समावेश आहे. स्मार्ट बॅन्डच्या केसला बटण आहे. तर पट्टा हा fluoroelastomer ने बनलेला आहे. 50 मीटर पर्यंत त्याला water resistant क्षमता आ हे.

स्मार्ट वॉच मधील सेंसर मध्ये accelerometer, gyroscope,आणि optical heart rate sensor,आहे. याच्या माध्यमातून हार्ट रेट, SpO2, respiratory rate,आणि abnormal breathing वर लक्ष ठेवता येते. Huawei च्या proprietary TrueSleep technology च्या माध्यमातून स्लीप सायकल वर लक्ष ठेवता येते. Pulse Wave Arrhythmia Analysis च्या माध्यमातून हार्ट रिदम मध्ये काही दोष असल्यास तो समजतो. नवीन मल्टी-चॅनल मॉड्यूल आणि स्मार्ट फ्यूजन अल्गोरिदमच्या मदतीने ते सुधारित heart rate tracking प्रदान करू शकते असा Huaweiचा दावाआहे.

Huawei Band 9 मध्ये 100 पेक्षा अधिक वर्कआऊट मोड्स आहेत. ज्यामध्ये स्विमिंग मोड देखील आहे.
Huawei, चं हे स्मार्ट बॅन्ड 14 दिवस चार्ज राहते. 45 मिनिटांमध्ये संपूर्ण स्मार्ट वॉच चार्ज होऊ शकतं.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. OnePlus Nord Buds 4 Pro भारतात १९ मार्चला लॉन्च होणार
  2. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  3. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  4. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  5. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  6. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  7. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  8. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  9. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  10. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »