Huawei Band 10 झालं लॉन्च पहा दमदार फीचर्स

Huawei Band 10 ची भारतामधील किंमत polymer case model साठी Rs. 6,499 पासून सुरू झाली आहे. तर aluminium alloy variant ची किंमत Rs. 6,999 आहे.

Huawei Band 10 झालं लॉन्च पहा दमदार फीचर्स

Photo Credit: Huawei

हुआवेई बँड १० पॉलिमर आणि अॅल्युमिनियम अलॉय केस प्रकारांमध्ये येतो

महत्वाचे मुद्दे
  • Polymer आणि Aluminium Alloy अशा दोन केस मटेरियल ते स्मार्टवॉच उपलब्ध
  • स्मार्टबॅन्ड्स केवळ Amazon वर खरेदी करू शकता
  • Huawei Band 10 मध्ये 1.47-inch AMOLED rectangular display with Always On
जाहिरात

Huawei कडून त्यांच्या स्मार्ट वेअरएबल डिव्हाईसच्या रेंज मध्ये आता Band 10 भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. Huawei Band 10 मध्ये 1.47-inch AMOLED rectangular display आहे. यामध्ये Always On Display चा सपोर्ट आहे. या स्मार्टफोनमध्ये 14 दिवसांपर्यंत टिकेल अशा बॅटरी लाईफचा समावेश आहे. polymer आणि aluminium alloy अशा दोन केस मटेरियल ते स्मार्टवॉच उपलब्ध असणार आहे. Huawei Band 10 मध्ये आरोग्याच्या निगडीत गोष्टींवर नियंत्रण ठेवते. ज्यात health metrics, including sleep-heart rate variability (HRV), stress levels,चा समावेश आहे. सोबतच Emotional Wellbeing Assistant देखील आहे. Huawei हे हा स्मार्टबॅन्ड फेब्रुवारी महिन्यात काही निवडक ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केला होता.

Huawei Band 10 ची किंमत, रंग आणि उपलब्धता

Huawei Band 10 ची भारतामधील किंमत polymer case model साठी Rs. 6,499 पासून सुरू झाली आहे. तर aluminium alloy variant ची किंमत Rs. 6,999 आहे. कंपनीने १० जूनपर्यंत वैध असलेल्या लाँच ऑफरची घोषणा केली आहे, ज्यामुळे किंमती अनुक्रमे 3699 आणि 4199 रुपयांपर्यंत कमी होतील. ग्राहक दोन्ही प्रकारचे स्मार्टबॅन्ड्स केवळ Amazon वर खरेदी करू शकतात. पॉलिमर केस काळ्या आणि गुलाबी रंगात उपलब्ध आहे, तर aluminium alloy मॉडेल निळ्या, हिरव्या, मॅट काळ्या, जांभळ्या आणि पांढऱ्या रंगात येतात.

Huawei Band 10 मधील फीचर्स

Huawei Band 10 मध्ये 1.47-inch AMOLED rectangular display with Always On Display support आहे. यामुळे युजर्सना महत्त्वाच्या माहितीची स्पष्ट visibility मिळते. यामध्ये touch आणि swipe control आहे. navigation साठी साईड बटण आहे. स्क्रिन रेझ्युलेशन 194×368 pixels आहे आणि pixel density ही 282ppi आहे. यामध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग देखील आहे. Emotional Wellbeing Assistant आहे. हे असिस्टंट वेलनेस टिप्स देते आणि शांत किंवा सकारात्मक watch face suggestions देते. युजर्सना ताण मॅनेज करण्यास मदत करण्यासाठी इनबिल्ट breathing exercises ना सपोर्ट करते. Band 10 मध्ये अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग वाढविण्यासाठी accelerometer, gyroscope, आणि magnetometer असल्याने अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग सुधारते. स्मार्ट बँड स्विम स्ट्रोक आणि लॅप डिटेक्शनमध्ये 95 टक्के अचूकता दर देऊन जलतरणपटूंना लक्ष्य करतो. हे AI बेस्ड stroke recognition सह nine-axis sensor आहे. या बँडला 5ATM वॉटर रेझिस्टन्स रेटिंग देखील आहे आणि ते अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मना सपोर्ट करते.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Xiaomi 17 Ultra मध्ये मिळू शकतो 200MP झूम कॅमेरा आणि 50MP मुख्य सेन्सर – रिपोर्ट
  2. OnePlus 15 मध्ये मिळणार 7,300mAh ची बॅटरी, Snapdragon 8 Elite Gen 5 चा दमदार परफॉर्मन्स
  3. Moto X70 Air भारतात लवकरच दाखल होणार? पाहा खास फीचर्स, किंमतीचे अंदाज
  4. Snapdragon 8 Elite SoC आणि 165Hz डिस्प्लेसह OnePlus Ace 6 झाला अधिकृत; पहा किंमत काय?
  5. Vivo X300 सिरीज भारतात लॉन्च होणार? Zeiss टेलिफोटो एक्स्टेंडर किट्ससह येण्याची शक्यता
  6. Vivo च्या आगामी S50 सिरीजमधील मूळ फीचर्स आले समोर, नोव्हेंबर महिन्यात होणार लॉन्च
  7. HMD Fusion 2 ची लीक झाली स्पेसिफिकेशन्स; फोनमध्ये असणार Snapdragon 6s Gen 4, 120 Hz डिस्प्ले, Smart Outfits Gen 2
  8. Nothing Phone 3a Lite 5G Geekbench लीकमध्ये समोर; पहा काय आहेत फीचर्स
  9. iQOO चाहत्यांसाठी खुशखबर! 27 नोव्हेंबरला येतोय iQOO 15 दमदार फीचर्स सह
  10. OnePlus 15 आणि Ace 6 फ्लॅगशिप स्मार्टफोन च्या किंमती झाल्या लीक
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »