जाणून घ्या Infinix XE27 आणि Infinix Buds Neo ची वैशिष्ट्ये

जाणून घ्या Infinix XE27 आणि Infinix Buds Neo ची वैशिष्ट्ये
महत्वाचे मुद्दे
  • नव्याने लॉन्च झालेले Infinix XE27 हे 10mm ड्रायव्हर्सने समर्थित आहेत.
  • Infinix नुसार Buds Neo TWS एकदा चार्ज केल्यावर 6 तास चालतात.
  • Infinix XE27 TWS हे इयरफोन्स सक्रिय आवाज रद्द करण्यासाठी समर्थ आहेत.
जाहिरात
Infinix या स्मार्टफोन कंपनीने कदाचित 2024 हे वर्ष सर्व नवीन उपकरणांसोबत बाजारपेठेत प्रवेश करायचे ठरवले आहे. कारण आता infinix ने आपले नवीन TWS इयरफोन बाजारात आणले आहेत. गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी Infinix च्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कंपनीने त्यांचे दोन नवीन TWS इयरफोन्स म्हणजेच Infinix XE27 आणि Infinix Buds Neo हे लॉन्च केले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, काय आहेत या नवीन TWS इयरफोन्सची किंमत आणि वैशिष्ट्ये. 

Infinix XE27 आणि Infinix Buds Neo ची किंमत आणि उपलब्धता

Infinix XE27 आणि Infinix Buds Neo हे दोन्ही इयरफोन जरी 22 ऑगस्टला लॉन्च झाले असले तरीसुद्धा ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला 26 ऑगस्ट पर्यंत वाट पहावी लागणार आहे. हे इयरफोन्स 26 ऑगस्ट या दिवशी फ्लिपकार्टवर लॉन्च करण्यात येत असून येथेच खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहेत. Infinix XE27 या इयरफोन्सची किंमत 1,699 तर Infinix Buds Neo या इयरफोन्सची किंमत 1,399 इतकी ठेवण्यात आली आहे. 

Infinix XE27 ची वैशिष्ट्ये

Infinix XE27 हे इयरफोन्स आधुनिक ANC तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आले आहेत. हे TWS इयरफोन पांढरा आणि निळा अशा दोन रंगांमध्ये तुम्हाला खरेदी करण्यासाठी उपलब्ध असणार आहेत. यामध्ये आधुनिक ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन (ANC) तंत्रज्ञान वैशिष्ट्यीकृत करण्यात आलेच आहेत परंतु क्वाड माइक एन्व्हायर्नमेंटल नॉईज कॅन्सलेशन (ENC) प्रणाली सुध्दा यामध्ये देण्यात आली आहे. ज्यामध्ये दैनंदिन वापरासाठी कठोरता सहन करून मजबूत बिल्ट वैशिष्ट्यीकृत करण्यात आले आहे.

Infinix XE27 हे इयरफोन्स प्रीमियम बिल्ट गुणवत्तेसह एका आकर्षक आणि मोहक डिझाईन मध्ये बनविण्यात आले आहेत. वापरकर्ते मल्टीफंक्शनल टच कंट्रोल आणि Google फास्ट पेअर सपोर्टसह फ्लॅश कनेक्टद्वारे ऑफर केलेल्या अखंड कनेक्टिव्हिटीसाठी नक्कीच समाधानी असतील. या इयरफोन्सला IPX4 रेटिंग सुध्दा मिळाले आहे, जे वॉटर रेझिस्टन्स सोबतच टिकाऊपणा देण्याचे देखील काम करते. या इयरफोन्स ची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर 5 तासांचा प्लेबॅक वेळ आणि 28 तासापर्यंत केस सोबत चालण्याची क्षमता ठेवते 

Infinix Buds Neo ची वैशिष्ट्ये

नव्याने लॉन्च झालेले Infinix Buds Neo हे इयरफोन्स 13mm ड्रायव्हर्स सोबत जरी सुसज्ज असले, तरीसुध्दा ANC प्रणालीचे समर्थन करत नाहीत. पण हे इयरफोन्स ENC कार्यक्षमता सक्षम करणाऱ्या समान संख्येच्या मायक्रोफोनने समर्थित आहेत. त्यासोबतच हे स्पर्श नियंत्रणासाठी देखील समर्थन देते.

Infinix या स्मा्टफोन कंपनीच्या म्हणन्यानुसार Infinix Buds Neo इयरफोन्स एकदा चार्ज केल्यानंतर सहा तासांचा प्लेबॅक वेळ आणि 22 तासांपर्यंत केस सोबत बॅटरी लाईफ देण्यास सक्षम आहेत. या इयरफोन्सला IPX4 रेटिंग देखील मिळाले आहे ज्यामुळे हे इयरफोन्स धूळ आणि पाणी प्रतिरोधक आहेत. यामध्ये तुम्हाला टच पॅनल आणि लो लेतन्सी मोड देखील देण्यात येत आहे
 
Comments
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »