OnePlus ने नुकताच त्यांचा एक टॅबलेट आणि स्मार्टफोन लॉन्च केला आहे आणि त्यानंतर आता काही दिवसांच्या कालावधीतच ही कंपनी घेऊन आली आहे त्यांचे नवीन इयरबड्स म्हणजेच One Plus Buds Pro 3. हे इयरबड्स अजूनही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लॉन्च झालेले नसून ते कंपनीकडून केव्हा लॉन्च करण्यात येतील आणि या इयरबड्सची काय वैशिष्ट्ये असतील हे जाणून घेऊया आजच्या ब्लॉगमध्ये.
OnePlus Buds Pro 3 लॉन्च होण्याची तारीख आणि किंमत
Tipster वरून मिळालेल्या माहितीनुसार One Plus Buds Pro 3 हे इयरबड्स One Plus कडून एका वरच्युअल इव्हेंट मधून 23 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता भारतात लॉन्च करण्यात येणार आहेत. तुम्ही सुध्दा या कार्यक्रमाचे सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला OnePlus India या यूट्यूब चॅनल वर किंवा OnePlus च्या अधिकृत वेबसाईट वर उपस्थित राहावे लागेल. असे म्हटले जात आहे की या कार्यक्रमासाठी भारतीय संगीतकार अनुव जैन सोबत अन्य कलाकार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
One Plus Buds Pro 3 हे इयरबड्स मागील वर्षी लॉन्च झालेल्या One Plus Buds Pro 2 चे उत्तराधिकारी मानले जात असून यात काही नवीन अपडेट्स देखील करण्यात येऊ शकतात ते सुध्दा समान किंमतीमध्ये. म्हणजेच कदाचित या इयरबड्सची किंमत भारतात 13,999 रुपये असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, तर दुसरीकडे Pro 2 प्रमाणेच याची किंमत 11,999 रुपयांपासून सुरू करण्यात येऊ शकते.OnePlus Buds Pro 3 वैशिष्ट्ये
OnePlus Buds Pro 3 या इयरबड्स मध्ये LHDC 5.0 कोडेकच्या समर्थनासोबतच 11mm वूफर आणि 6mm ट्विटर सह दोन ड्रायव्हर्सचा सेटअप असू शकतो. या इयरबड्स मध्ये 50dB नॉईस कॅन्सलेशन देण्यात आले आहे, जे संभाषण आणि व्हॉईस कॉलचा अनुभव पूर्ववर्तीपेक्षा दुप्पट स्पष्ट आणि चांगला देऊ शकतात.
सर्वांत महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे या इयरबड्सची बॅटरी जी एकदा चार्ज केल्यानंतर केस सोबत तब्बल 43 तास चालण्याची क्षमता प्रदान करते. Pro 2 च्या तुलनेत हे इयरबड्स जवळजवळ चार तास अधिक चालण्याची क्षमता ठेवतात. या इयरबड्सचे मुख्य आकर्षण म्हणजे हे फक्त 10 मिनिटे चार्ज केल्यानंतर 5 तासांचा संगीत प्लेबॅक वेळ देण्यास समर्थ आहेत.
Lunar Radiance आणि Midnight Opus अशा दोन रंगांमध्ये तुम्ही हे इयरबड्स खरेदी करू शकता. OnePlus Buds Pro 3 मध्ये IP55 स्प्लॅश आणि धूळ प्रतिरोधक वैशिष्ट्य देखील समाविष्ट केलेले असू शकते. ज्यामुळे धूळ, घाम आणि हलका पाऊस यांपासून सहज संरक्षण मिळण्यास मदत होते. शिवाय, हे इयरबड्स ब्लूटूथ आवृत्ती 5.4 चे देखील समर्थन करतील असा अंदाज आहे. सोबतच हे इयरबड्स केवळ 94 मिलीसेकंदमध्ये अल्ट्रा-लो लेटन्सी ऑडिओ प्रदान करतात.