OnePlus चा नवा नेकबँड भारतात लाँच; एका चार्ज मध्ये तब्बल 36 तास चालणार, विक्री 24 जूनपासून

वनप्लसचे Bullets Wireless Z3 इयरफोन्स 10 मिनिटं चार्ज केल्यानंतर 27 तास चालू शकतात.

OnePlus चा नवा नेकबँड भारतात लाँच; एका चार्ज मध्ये तब्बल 36 तास चालणार, विक्री 24  जूनपासून

Photo Credit: OnePlus

वनप्लस बुलेट्स वायरलेस झेड३ माम्बो मिडनाईट आणि साम्बा सनसेट रंगांमध्ये उपलब्ध आहे

महत्वाचे मुद्दे
  • Mambo Midnight (black) आणि Samba Sunset (red) रंगात उपलब्ध असेल
  • Bullets Wireless Z3 पूर्ण चार्ज केल्यानंतर 36 तासांपर्यंत music playback
  • Bullets Wireless Z3 ची भारतामधील किंमत 1,699 रुपये आहे
जाहिरात

OnePlus ने भारतात त्यांचे नवे वायरलेस ऑडिओ डिव्हाइस, Bullets Wireless Z3 अधिकृतपणे लाँच केले आहे. OnePlus कंपनीच्या म्हणण्यानुसार, The Bullets Wireless Z3 पूर्ण चार्ज केल्यानंतर 36 तासांपर्यंत music playback देते, तर 10 मिनिटांच्या चार्जिंगनंतर 27 तासांपर्यंत वापरण्याची सुविधा देते. तर नेकबॅंक पूर्ण चार्ज केल्यानंतर कॉलचा कालावधी 21 तासांचा असतो.भारतात Bullets Wireless Z3 ची किंमत,Bullets Wireless Z3 ची किंमत 1,699 रुपये आहे. हा नवीन नेकबँड 24 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजता विविध ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. OnePlus Bullets Wireless Z3 हा वनप्लसच्या अधिकृत वेबसाइट, अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, Myntra आणि क्रोमा, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स आणि बजाज इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या निवडक ऑफलाइन रिटेल आउटलेट्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Bullets Wireless Z3 ची स्पेसिफिकेशन

OnePlus कंपनीच्या माहितीनुसार, Bullets Wireless Z3 पूर्ण चार्ज केल्यानंतर 36 तासांपर्यंत music playback देते, तर 10 मिनिटांच्या चार्जिंगनंतर 27 तासांपर्यंत वापरता येतो. पूर्ण चार्ज केल्यानंतर कॉल कालावधी 21 तासांचा असतो. ऑडिओ फीचर्समध्ये 12.4 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्सचा समावेश आहे, जे बासवर भर देऊन balanced sound profile देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.

नेकबँडमध्ये नवीन BassWave algorithm देखील समाविष्ट आहे, जे मिड किंवा व्होकल्स विकृत न करता low-end frequencies वाढवते. Sound Master EQ फंक्शनद्वारे चार प्रीसेट ऑडिओ मोड्समध्ये स्विच करू शकतात. यामध्ये बॅलेन्स्ड, सेरेनेड, बास आणि बोल्ड असे चार मोड्स युजर्सना मिळणार आहेत.

OnePlus चे Bullets Wireless Z3 हे कॉल दरम्यान आवाजाची स्पष्टता सुधारण्यासाठी AI-based noise cancellation technology ने सुसज्ज आहेत. ते रिअल टाइममध्ये व्हॉइस इनपुट वेगळे करण्यासाठी environmental noise cancellation (ENC) आणि एआय अल्गोरिदम एकत्र करते. शिवाय, हे डिवाईस 3D स्पेशियल ऑडिओला सपोर्ट करतात, जे 360-अंश sound environment ला सपोर्ट करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. बिल्ट-इन शॉर्टकट युजर्सना कॉलिंग, म्युझिक प्लेबॅक किंवा रिमाइंडर्स सेट करणे यासारख्या फंक्शन्समध्ये हँड्स-फ्री प्रवेशासाठी व्हॉइस असिस्टंटना बोलावण्यास सक्षम करते.

कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये Bluetooth 5.4, गुगल फास्ट पेअरसाठी सपोर्ट आणि मॅग्नेटिक इअरबड्स समाविष्ट आहेत जे त्यांच्या स्थितीनुसार ऑटो-कनेक्ट आणि डिस्कनेक्ट होतात. हे इयरफोन्स IP55 रेटेट असल्याने ते धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहणार आहेत. हे नेकबॅन्ड दोन फिनिशमध्ये येतात. हा नेकबॅन्ड Mambo Midnight (काळा) आणि Samba Sunset (लाल) या रंगात ते उपलब्ध असतील.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Apple च्या टीझरने वाढवली ग्राहकांची उत्सुकता; M5 MacBook Pro लॉन्चची तयारी सुरू
  2. Realme GT 8 Series कधी येणार बाजारात? Realme ने पहा केलेली मोठी घोषणा
  3. YouTube ने जारी केले मोठे अपडेटस; आधुनिक Video Player आणि Threaded Replies फीचर जारी
  4. Moto X70 Air होणार चीन मध्ये लॉन्च; अल्ट्रा थीन स्मार्टफोनच्या सेगमेंटमध्ये नवा फोन
  5. Vivo च्या नव्या TWS 5 ईअरबड्समध्ये 60dB ANC, LHDC कोडेक आणि 48 तास बॅटरी
  6. Bose-ट्यून केलेले Noise Master Buds Max भारतात लॉन्च; मिळणार 60 तासांचा प्लेबॅक
  7. AI ची मज्जा अनुभवा तुमच्या स्मार्टफोनमध्ये! Nano Banana आता लोकप्रिय अ‍ॅप्समध्ये
  8. आता वेबपेज वाचायची गरज नाही; Gemini थेट देणार सारांश
  9. Redmi K90 Pro झाला Geekbench वर स्पॉट? Snapdragon 8 Elite Gen 5 Chipset सह लॉन्च होण्याचा अंदाज; पहा अपडेट्स
  10. Nothing Phone 3a चं आता येणार लाईट व्हर्जन; समोर आले स्पेसिफिकेशन्सचे लीक्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »