Samsung कडून भारतामध्ये Black Friday Sale ची घोषणा करण्यात आली आहे. सॅमसंगने Galaxy wearables लाईन अप वर डिस्काऊंटस जाहीर करण्यात आले आहेत. सॅमसंग प्रिमियम स्मार्टवॉचेस Galaxy Watch Ultra आणि Galaxy Watch 7 वर दमदार सूट मिळणार आहे. तर Galaxy Buds 3, Galaxy Buds 3 Pro, आणि Galaxy Buds FE ची खरेदी करणार्यांना कॅशबॅक किंवा अपग्रेड बाऊंसेस 5000 रूपयांपर्यंत मिळणार आहे. Galaxy wearables हे no-cost EMI पर्यायासह देखील खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
Samsung च्या Black Friday Sale Offers मध्ये Galaxy Watch Ultra वर कॅशबॅक 12 हजार आणि अपग्रेड साठी 10 हजारांचा बोनस देणार आहे. दरम्यान लॉन्च झाला तेव्हा हा wearable भारतामध्ये 59,999 रूपयांमध्ये उपलब्ध केला होता. याप्रमाणेच Galaxy Watch 7 विकत घेणार्यांना 8 हजार रूपयांपर्यंत कॅशबॅक किंवा अपग्रेड बोनस मिळणार आहे. याची मूळ किंमत 29,999 ( ब्लूटुथ व्हेरिएंट) होती तर सेल्युलर व्हेरिएंटची किंमत 33,999 रूपये आहे.
Galaxy Buds 3 Pro ची किंमत Rs. 19,999 आहे. यासोबत 5000 रूपये कॅशबॅक आणि अपग्रेड बोनस आहे. यामुळे त्याची किंमत कमी होऊन Rs. 14,999 होणार आहे. तर Galaxy Buds 3 वर वर 4000 ची कॅशबॅक आणि अपग्रेड बोनस जाहीर केला आहे. याची मूळ किंमत 14,999 आहे.
Samsung चे affordable Galaxy Buds FE हे लॉन्च झालेले तेव्हा 9999 ला भारतामध्ये उपलब्ध होते. आता ते Black Friday sale मध्ये 4000 रूपयांच्या कॅशबॅक आणि अपग्रेड बोनस सह उपलब्ध आहेत. जे ग्राहक Galaxy Watch Ultra, Galaxy Watch 7, Galaxy Buds 3 Pro, आणि Galaxy Buds 3 विकत घेण्याच्या विचारामध्ये आहेत त्यांना 24 महिन्यासाठी no-cost EMI चा देखील पर्याय देण्यात आला आहे.
याव्यतिरिक्त, नवे Galaxy S series आणि Z series स्मार्टफोन घेणार्या ग्राहकांना रु.18,000 पर्यंतच्या मल्टी-बाय ऑफर मिळणार आहे.
Galaxy Watch 7, Watch Ultra, आणि Galaxy Buds 3 सीरीज या वर्षी जुलैमध्ये Samsung च्या Galaxy Unpacked कार्यक्रमादरम्यान रिलीज करण्यात आले आहेत. Galaxy Buds FE इयरबड्स गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च करण्यात आले होते.
जाहिरात
जाहिरात