Dor Play App मध्ये पहा युजर्सना काय मिळणार? पहा फीचर्स

सबस्क्रिप्शन सक्रिय करण्यासाठी, युजर्सना त्यांच्या हँडसेटवर Dor Play ॲप डाउनलोड करावे लागेल

Dor Play App मध्ये पहा युजर्सना काय मिळणार? पहा फीचर्स

Photo Credit: Google Play

Dor Play ॲप केवळ स्मार्टफोनवर समर्थित आहे

महत्वाचे मुद्दे
  • Dor Play subscription भारतामध्ये प्रत्येक 3 महिन्यांसाठी 399 रूपयांमध्ये
  • खरेदीसाठी फ्लिपकार्टद्वारे सबस्क्रिप्शन खरेदी करण्याची सोय आहे
  • Dor Play ॲप युनिव्हर्सल सर्च ऑफर करते, ज्याचा दावा आहे की कंटेंट शोधणे स
जाहिरात

Dor Play application भारतामध्ये गुरूवारी लॉन्च करण्यात आला. हे अ‍ॅप Android आणि iOS users ना Streambox Media कडून देण्यात आले आहे. या अ‍ॅप मध्ये युजर्सना 20 पेक्षा अधिक OTT platforms मिळतील. 300 पेक्षा जास्त live TV channels मिळतील. युजर्स नव्याने लॉन्च झालेले अ‍ॅप सब्सस्काईब करू शकतात त्यांना प्रत्येक streaming service किंवा चॅनेल साईन अप करण्याची गरज नाही. मागील वर्षी कंपनीने Dor सोबत Dor TV OS,आणलं होतं. जी subscription-based television service होती. Streambox Media ने Dor QLED smart TVs नोव्हेंबर 2024 मध्ये आणले होते.

Dor Play subscription भारतामध्ये प्रत्येक 3 महिन्यांसाठी 399 रूपयांमध्ये मिळणार आहे. हे स्मार्टफोन वर सहज मिळेल. iOS आणि Android दोन्ही युजर्सना ही सेवा मिळणार आहे त्यासाठी त्यांना हे App Store आणि Play Store,वरून डाऊनलोड करावं लागणार आहे.

खरेदीसाठी फ्लिपकार्टद्वारे सबस्क्रिप्शन खरेदी करण्याची सोय आहे. त्यांना प्रत्येकाला एक unique coupon code मिळेल. सबस्क्रिप्शन सक्रिय करण्यासाठी, युजर्सना त्यांच्या हँडसेटवर Dor Play ॲप डाउनलोड करावे लागेल आणि त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरसह unique coupon code टाकावा लागेल.

Dor Play ची फीचर्स

Flipkart listing नुसार, Dor Play 20 हून अधिक OTT प्लॅटफॉर्म आणि 300 टीव्ही चॅनेल एकाच प्लॅटफॉर्मवर पाहू शकतील. हे लाइव्ह स्पोर्ट्स, चित्रपट, रिॲलिटी टीव्ही कार्यक्रम आणि काल्पनिक टीव्ही मालिका उपलब्ध करणार आहे. युजर्स एका पेक्षा अधिक ॲप्समध्ये स्विच न करता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील सामग्रीचा आनंद घेऊ शकतात.

Dor Play ॲप युनिव्हर्सल सर्च ऑफर करते, ज्याचा दावा आहे की कंटेंट शोधणे सोपे होईल. हे फीचर युजर्सना एकाच ठिकाणी एकापेक्षा अधिक प्लॅटफॉर्मवर शोधण्याची परवानगी देते. Trending आणि Upcoming sections मध्ये युजर्सना नवीन कंटेंट ची माहिती मिळेल.

अधिक personalized experience साठी, Dor Play स्मार्ट फिल्टर ऑफर करते, जे युजर्सना आनंदी, उदासीन, साहसी आणि बरेच काही यांसारख्या त्यांच्या मूडवर आधारित कंटेंट शोधण्यात मदत करतात. मूड-आधारित फिल्टरसह, ॲप युजर्सच्या पसंतीच्या मूडमध्ये बसण्यासाठी सामग्रीची शिफारस करू शकते. युजर्सना त्यांच्या प्राधान्यांशी जुळण्यासाठी शैली किंवा त्यांच्या आवडत्या कलाकारांनुसार कंटेंट फिल्टर करण्याची परवानगी आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. फोल्ड डिझाइनचा सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल; पहा फीचर्स
  2. Samsung Galaxy Z Fold 7 भारतात लॉन्च; इथे पहा किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स
  3. Galaxy Buds 3 Pro वर Amazon Prime Day सेलमध्ये मोठा डिस्काउंट जाहीर
  4. Amazon Prime Day 2025 मध्ये iQOO स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स जाहीर; पहा अपडेट्स
  5. 14 जुलै ला लॉन्च होणार्‍या Vivo X Fold 5 आणि X200 FE च्या किंमती इंटरनेट वर लीक
  6. आयफोनही आता येणार दमदार बॅटरीज सोबत; पहा iPhone 17 Pro Max बद्दलची अपडेट
  7. Honor X9c 5G भारतात 7 जुलै येतोय; 12 जुलै पासून विक्री होणार Amazon वर सुरू
  8. Amazon चा 72 तासांचा Prime Day सेल जाहीर; पहा स्मार्टफोन सह कोणत्या वस्तूंवर मिळणार सूट
  9. Nothing Headphone (1) भारतात लॉन्च; पहा प्रीमियम फीचर्स, किंमत इथे
  10. Nothing Phone (3) भारतात अखेर आलाच; किंमत ₹79,999 पासून सुरू
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »