नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांचा 'फ्रेम' हा मराठी चित्रपट झी५वर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे
नागराज मंजुळे यांच्या आगामी 'खाशाबा' चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच त्यांचा आणखी एक आशयघन चित्रपट 'फ्रेम' ओटीटीवर प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे. १० जुलै २०२६ रोजी झी५वर प्रदर्शित झालेला हा मराठी चित्रपट सध्या टॉप ट्रेंडिंग चित्रपटांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून, सामाजिक विषय हाताळणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दिग्दर्शक विक्रम पटवर्धन यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'फ्रेम'मध्ये नागराज मंजुळे आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत मुग्धा गोडसे आणि अक्षया गुरव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. फोटो जर्नालिझमच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा पत्रकारितेतील नैतिकता, व्यावसायिकता आणि माणुसकी यांमधील संघर्ष प्रभावीपणे मांडते.
चित्रपटात नागराज मंजुळे यांनी अनुभवी छायाचित्रकार चंदू पानसरे ही भूमिका साकारली आहे. कोणतीही दुर्घटना असो किंवा संकट, सर्वप्रथम छायाचित्र टिपणे हेच त्याचे ध्येय असते. दुसरीकडे अमेय वाघ यांनी साकारलेला सिद्धार्थ देशमुख हा नवोदित फोटो पत्रकार संवेदनशील आणि माणुसकीला प्राधान्य देणारा आहे. या दोन विचारसरणींमधील संघर्षातून पत्रकारितेतील नैतिक प्रश्न प्रेक्षकांसमोर उभे राहतात.
विशेष म्हणजे, नागराज मंजुळे यांनी पडद्यावर साकारलेले चंदू पानसरे हे पात्र त्यांच्या वास्तविक व्यक्तिमत्त्वाच्या अगदी विरुद्ध आहे. चित्रपटाचा शेवट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतो आणि "एक चांगला माणूस असणं हीच खरी गरज आहे" हा संदेश ठळकपणे अधोरेखित करतो. आशय, अभिनय आणि वास्तववादी मांडणीमुळे 'फ्रेम' सध्या मराठी ओटीटीवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे.
जाहिरात
जाहिरात
Google Reportedly Begins Rolling Out Android Backup Storage Policy Update
Telegram Gets New Rich Text Editor, Communities, and Ephemeral Bot Messages
Samsung's 'Back to School' Sale Brings Discounts on Galaxy S26 Series, Galaxy Book 6 Pro, Galaxy Tab S11 Ultra and More