JBL ने Vienna हा प्रीमियम वायरलेस स्पीकर लॉन्च केला आहे.
JBL ने आपले नवीन स्पीकर्स बाजारात लॉन्च केले आहेत, जे अनोख्या फ्लोटिंग लिरिक्स फीचरसह येतात. म्हणजेच, संगीतासोबत गाण्याचे बोलही स्क्रीनवर तरंगताना दिसतील. या स्पीकरमध्ये 18.5 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला असून कंपनीने त्याचे संरक्षण टेम्पर्ड ग्लासने केले आहे. यात 2.1-चॅनेल स्टीरिओ सिस्टम मिळते. साउंडसाठी कंपनीचा दावा आहे की हा सेटअप डीप बास, स्पष्ट व्होकल्स आणि ब्राइट ट्रेबल फीचर पहायला मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth 5.4, USB-C आणि AUX सपोर्ट देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया याची किंमत आणि फीचर्स सविस्तर.
JBL Vienna Speaker किंमत
JBL Vienna स्पीकर्सच्या किमतीबाबत कंपनीने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. हे स्पीकर्स सध्या चायनाच्या बाजारात (via) सादर करण्यात आले आहेत. लवकरच त्यांच्या किंमती आणि उपलब्धतेबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
JBL Vienna स्पेसीफिकेशन
JBL Vienna स्पीकरमध्ये 2.1-चॅनेल स्टीरिओ सिस्टम देण्यात आली आहे. या स्पीकरमध्ये 3.23 इंचाचे फुल-रेंज ड्रायव्हर्स आहेत. तसेच 8.5 इंचाचा रेसट्रॅक-आकाराचा बास ड्रायव्हर देण्यात आला आहे. याशिवाय 5 इंचाचे पॅसिव्ह रेडिएटर्सही आहेत. हे सर्व मिळून 100W पीक पॉवर निर्माण करतात. या स्पीकरचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा डिस्प्ले. हा 18.5 इंचांच्या डिस्प्लेसह येतो. या डिस्प्लेवर गाण्यांचे बोल हवेत तरंगत असल्यासारखे दिसतात.
स्क्रीनवर कंपनीने अल्ट्रा-व्हाइट आणि हाय-ट्रान्सपरंट टेम्पर्ड ग्लासचा वापर केला आहे. हलणारे प्रकाश आणि सावल्यांच्या इफेक्टसह लिरिक्स असे दिसतात की ते हवेत तरंगत आहेत. वापरकर्त्याला या स्क्रीनवर स्वतःचे फोटोही वापरण्याची सुविधा मिळते.
साउंडसाठी कंपनीचा दावा आहे की हा सेटअप डीप बास, स्पष्ट व्होकल्स आणि ब्राइट ट्रेबल प्रदान करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth 5.4, USB-C आणि AUX सपोर्ट देण्यात आला आहे. याचा वापर घड्याळ म्हणूनही करता येतो. यात ड्युअल टाइम-झोन स्टँडबाय डिस्प्ले आणि कस्टमाइझ करता येणारा फोटो क्लॉक फेसही देण्यात आला आहे.
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy Tab S10 Lite
Starts from ₹33,499
JBL New Live 780NC Wireless Headphones
Starts from ₹15,999
OPPO Reno 16
Starts from ₹61,999
HP 303D Laser Single Function Monochrome Printer
Starts from ₹13,999
HP MFP 323DNW Laser Multi Function Monochrome Printer
Starts from ₹21,999
HP 303DW Laser Single Function Wireless Monochrome Printer
Starts from ₹15,999
Samsung Galaxy Z Fold 8, Z Fold 8 Ultra, Z Flip 8, Galaxy Watch 9 Prices Leak Ahead of Galaxy Unpacked
Google Reportedly Begins Rolling Out Android Backup Storage Policy Update
Telegram Gets New Rich Text Editor, Communities, and Ephemeral Bot Messages