Samsung Galaxy S24 5G अमेझॉनवर 43,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे, या फोनची मूळ किमत 74,999 रूपये होती. मूळ किंमतीपेक्षा सध्या अमेझॉनवर 31,000 रूपयांची सूट देण्यात आली आहे.
Photo Credit: Flipkart
Amazon वर Samsung Galaxy S24 ची किंमत 31,000 ने कमी झाली आहे.
स्वस्तात फ्लॅगशीप ग्रेड स्मार्टफोन घेण्याचा तुमचा विचार असेल तर आता एक फायदेशीर संधी आहे. Samsung च्या Galaxy S24 5G,वर सध्या ऑफर सुरू आहे. अमेझॉनवर Galaxy S24 5G, हा फोन 74,999 रूपयांऐवजी Rs 45,999 मध्ये मिळणार आहे. अमेझॉनवर फ्लॅट सूट सोबतच काही कार्डस आणि बॅंक ऑफर्सच्या माध्यमातून सूट दिली जात आहे त्यामुळे फोनवर मोठी बचत होऊ शकते. Qualcomm च्या नवीन Snapdragon 8 Gen 3 चिपसेटने सुसज्ज असलेल्या या स्मार्टफोनमध्ये प्रभावी कॅमेरे आणि AMOLED display आहे. Amazon वरील Samsung Galaxy S24 डील कशी आहे हे घ्या जाणून!
Samsung Galaxy S24 5G अमेझॉनवर 43,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे, या फोनची मूळ किमत 74,999 रूपये होती. दरम्यान मूळ किंमतीपेक्षा सध्या अमेझॉनवर 31,000 रूपयांची सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, ग्राहकांना अमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड वापरून1319 रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळू शकतो. अमेझॉन कडून ग्राहकांना फक्त 1582 रुपयांपासून सुरू होणाऱ्या नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील दिला जात आहे.
ग्राहकांना त्यांचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 35,950 रुपयांपर्यंत एक्सचेंज व्हॅल्यू मिळवू शकतात. पण ही रक्कम स्मार्टफोनच्या ब्रँड आणि कार्यक्षमतेवर अवलंबून असेल. ग्राहकांना हवे असल्यास विस्तारित वॉरंटी किंवा अॅड-ऑन खरेदी करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे.
Samsung Galaxy S24 5G या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट120Hz आणि पीक ब्राइटनेस 2600 निट्स आहे. या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 8 Gen 3 processor चा समावेश आहे. स्मार्टफोनमध्ये 8GB RAM आणि 512GB storage आहे. हा स्मार्टफोन Android 16 operating system with One 8 वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 25W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 4,000 mAh बॅटरी आहे. या स्मार्टफोनमध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.3, NFC, and a USB 3.2 Gen 1 Type-C port सह IP68 ratingचा समावेश आहे.
Samsung Galaxy S24 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये OIS आणि 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा, 10MP टेलिफोटो कॅमेरा आणि 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
जाहिरात
जाहिरात
Xiaomi Pad 8 Pro Global Variant Visits Geekbench; Tipped to Launch Alongside Xiaomi 17 Series
Google Maps Is Adding Gemini Support for Walking and Cycling Navigation