तुमच्या iPhone मध्ये iOS 18 Update होणार का? इथे पहा त्याला डाऊनलोड करायच्या स्टेप्स

तुमच्या iPhone मध्ये iOS 18 Update होणार का? इथे पहा त्याला डाऊनलोड करायच्या स्टेप्स

Apple first showcased its latest OS updates, including iOS 18 at WWDC 2024 in June

महत्वाचे मुद्दे
  • iOS 18 update भारतासह जगभर डाऊनलोड साठी उपलब्ध
  • Control Centre मध्ये कस्टमायझेशन सह अनेक फायदेशीर फीचर्स मिळणार
  • iPhone XR सह पुढील मॉडेल साठी आता iOS 18 update उपलब्ध
जाहिरात

भारतासह जगभरात अ‍ॅपल (Apple) कडून iOS 18 उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोमवार 17 सप्टेंबर पासून हे अपडेट उपलब्ध झालं आहे. हे नवं अपडेट जून 2024 मध्ये वर्ल्डवाईड डेव्हलपर्स कॉन्फरंस (Worldwide Developers Conference) मध्ये दाखवण्यात आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील काही आठवड्यांमध्ये काही डेव्हलपर आणि पब्लिक बीटा अपडेट्स ( Developer and Public beta Updates ) जारी करण्यात आले आहेत. आता आयफोन युजर्सना भारतामध्ये हे अपडेट डाऊनलोड साठी उपल्बध आहे. यामुळे होम आणि लॉक स्क्रिन मध्ये कस्टमायझेशन शक्य आहे. अ‍ॅप्स रिव्हॅम्प झाले आहेत. दरम्यान पुढील महिन्यापासून आयफोनच्या मॉडेल्ससाठी कंपनीच्या आर्टिफिशिअल इंटिलिजंसच्या मदतीने काही फीचर्स उपलब्ध होणार आहेत.

iOS 18 Update कसे कराल डाऊनलोड?

सध्या अ‍ॅपल कडून जगभरात iOS 18 Update डाऊनलोड साठी उपलब्ध आहे. ते डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.

  1. आयफोन मध्ये सेटिंग्स (Settings) ओपन करा.
  2. Software Update option शोधण्यासाठी General tab मध्ये जा.
  3. iPhone आता स्वतःहून कोणते अपडेट्स बाकी आहेत का? ते पाहील.
  4. आता Download & Install पर्यायावर क्लिक करा. terms and conditions वाचा आणि त्याला सहमती द्या.

त्यानंतर iOS 18 डाऊनलोड होईल आणि तुमच्या आयफोन मध्ये इंस्टॉल होईल.

iOS 18 साठी पात्र डिव्हाईस कोणती असतील?

Apple ने दिलेल्या माहितीनुसार, सारी आयफोन मॉडेल्स ज्यांना iOS 18 developer and public beta updates मिळाले आहेत ते या अपडेटसाठी पात्र असणार आहेत. यामध्ये अ‍ॅपलचे नवे फ्लॅगशिप असलेले iPhone 15 Pro Max चा समावेश आहे. सोबतच iPhone XR सह जुनी मॉडेल्स देखील डाऊनलोड करू शकणार आहेत. 20 सप्टेंबरला लॉन्च झालेला iPhone 16 आणि त्याच्या सीरीज मधील आयफोन्स हे iOS 18 update सह येणार आहेत.

पहा आयफोन्सच्या कोणत्या मॉडेल मध्ये iOS 18 येऊ शकतं?

आयफोन च्या 20 मॉडेल्स मध्ये हे iOS 18 अपडेट डाऊनलोड करता येणार आहे.

  • आयफोन 16 सीरीज
  • आयफोन 15 सीरीज
  • आयफोन 14 सीरीज
  • आयफोन एसई (2022)
  • आयफोन 13 सीरीज
  • आयफोन 12 सीरीज
  • आयफोन 11 सीरीज
  • आयफोन एक्सएस मॅक्स
  • आयफोन एक्सएस
  • आयफोन एक्सआर
  • आयफोन एसई (2020)

iOS 18 update मध्ये काय मिळणार?

iMessages app ला आता RCS technology चा सपोर्ट मिळणार आहे. यामध्ये मेसेज शेड्युल करण्याची आणि 100MB पर्यंतचा फोटो पाठवण्याची सुविधा मिळेल.
Photos app मध्ये आता Collections feature मिळणार आहे ज्यात वेगवेगळ्या थीम वर आपोआप फोटो एकत्र करून मिळणार आहेत.
Passwords app मध्ये आता सारे पासवर्ड्स एकत्र दिसतील ज्यात passkeys, verification codes, Wi-Fi passwords,sign-in credentials एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत.
Siri जेव्हा AirPods सोबत पेअर असेल तेव्हा युजर्सना अनाऊसमेंट्सला प्रतिसाद हा हेड्स हलवून करता येणार आहे.
फोन कॉल आणि ऑडिओ यांचा रेकॉर्ड नोट्स अ‍ॅप मध्ये लिहला जाऊ शकतो.
कॅमेरा अ‍ॅप मध्ये आता फोटो किंवा व्हिडिओ मागे सुरू असलेल्या संगीतासह टिपता येणार आहे.

Apple Intelligence या iOS 18 अपडेट मध्ये समाविष्ट असणार का?

iOS 18 आता जगभर डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे पण Apple Intelligence या अपडेट मध्ये नसेल. ऑक्टोबर 2024 मध्ये पहिल्या टप्प्यात काही निवडक फोन मध्ये आयफोन युजर्सना हे अ‍ॅपल इंटेलिजन्स मिळणार आहे. मेल, नोट्स, वेब पेजेस आणि थर्ड-पार्टी ॲप्सद्वारे फोटोंमधून नको असलेला भाग काढून टाकण्यासाठी एक नवीन क्लीनअप टूल तयार करण्यासाठी, प्रूफरीडिंग साठी काही फीचर्स मिळणार आहेत

Comments
पुढील वाचा: iOS 18, IOS, Apple, iOS 18 update, iOS 18 design
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. 6,000mAh बॅटरी सह लॉन्च होणार Realme 14X
  2. Vivo V50 Series, Vivo Y29 4G दिसले EEC certification
  3. iQOO Neo 10 Pro मध्ये MediaTek Dimensity 9400 Chipset, AI features पहा काय आहे प्री रिझर्व्ह किंमत
  4. Oppo Reno 13 कोणत्या दमदार फीचर्स सह होणार लॉन्च पहा इथे
  5. Vivo Y300 5G ड्युअल रेअर कॅमेरा, 50-megapixel सह येणार पहा अन्य दमदार फीचर्स
  6. BSNL चा 84 दिवसांचा नवा रिचार्ज प्लॅन Airtel आणि Jio युजर्सना करतोय आकर्षित; पहा काय आहे दमदार प्लॅन
  7. आता कॉलिंग, एसएमएस ला सीम कार्डची गरज नाही, BSNL कडून direct-to-device satellite ची घोषणा
  8. OnePlus Ace 5 लवकरच होणार लॉन्च; भारतामध्ये OnePlus 13R म्हणून रिब्रॅन्ड होणार - रिपोर्ट्स
  9. BSNL युजर्सना आता देणार सेट-टॉप-बॉक्सशिवाय देणार Live TV पाहण्याची सुविधा; पहा काय आहे प्लॅन
  10. Vivo X200, X200 Pro, X200 Pro Mini मध्ये स्पेसिफिकेशन्स काय? घ्या जाणून
© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »