Apple या कंपनीने त्यांच्या नुकत्याच पर पडलेल्या "it's Glowtime" या कार्यक्रमात त्यांची iPhone 16 ही मालिका लॉन्च केली आहे, ज्याचे महत्वाचे दोन स्मार्टफोन म्हणजेच iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max लॉन्च केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोनचे वैशिष्टय म्हणजे मागील वर्षी लॉन्च झालेल्या iPhone 15 Pro सिरीज पेक्षा या दोन्ही स्मार्टफोनच्या किंमती कमी आहेत. चला तर मग बघुयात, Apple आपल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये कोणत्या किंमतीमध्ये काय वैशिष्ट्ये घेऊन आला आहे.
iPhone 16 Pro या स्मार्टफोनची किंमत भारतात 84,000 ते 1,19,900 रुपये तर iPhone 16 Pro Max या स्मार्टफोनची किंमत 1,00,700 ते 1,44,900 रुपयांपासून सुरू होत आहे. स्टोरेजच्या आधारावर या स्मार्टफोनचे वेगवेगळे प्रकार पडू शकतात ज्यामुळे किंमतीमध्ये बदल होऊ शकतो. हे दोन्ही स्मार्टफोन जरी 9 सप्टेंबर रोजी लॉन्च झाले असले तरीसुद्धा ते खरेदीसाठी कंपनीकडून 20 सप्टेंबर पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच 13 सप्टेंबर पासून तुम्ही हे स्मार्टफोन प्रिऑर्डर देखील करू शकता.
iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max हे दोन्ही स्मार्टफोन iOS 18 वर चालत असून 3nm A18 या चीप द्वारे समर्थित आहे. या दोन्ही स्मार्टफोनच्या मागच्या बाजूस तीन कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा सुध्दा बसविण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यामध्ये 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max या दोन्ही स्मार्टफोनला IP68 रेटिंग प्राप्त आहे. त्यासोबतच यामध्ये ॲक्शन बटन सोबतच कॅमेरा कंट्रोल बटन सुध्दा देण्यात आले आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये तुम्हा 1 TB पर्यंत अंतर्गत स्टोरेज देण्यात येत आहे. सामान्यपणे Apple त्यांच्या स्मार्टफोनच्या बॅटरी क्षमतेचा उल्लेख करत नाही पण या दोन्ही स्मार्टफोनची बॅटरी ही 150 आणि 27 वॅटच्या चार्जिंगचे समर्थन करते.
iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max मध्ये ॲपलच्या AI म्हणजेच Apple Intelligence चा समावेश आहे.
जाहिरात
जाहिरात