Photo Credit: Samsung
भारतामध्ये सॅमसंग ने Galaxy F-series portfolio मध्ये आता अजून एक नवा फोन आला आहे. बजेट सेगमेंटमध्ये Samsung Galaxy M05 नंतर आता सॅमसंग गॅलेक्सी एफ 05(Samsung Galaxy F05) भारतामध्ये मंगळवार 17 सप्टेंबर दिवशी लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन octa-core MediaTek Helio G85 चीपसेट वर काम करणार आहे. या फोनमध्ये 4 जीबी रॅमचा आहे. दरम्यान या स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh ची बॅटरी आहे. तर 25W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये 6.7 इंच एचडी प्लस स्क्रीन आहे. तर या स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सेल ड्युअल रेअर कॅमेरा आहे. यासोबतच 8 मेगा पिक्सेलचा सेल्फी शूटर आहे. आता या स्मार्टफोनची स्पेसिफिकेशन आणि किंमत काय असेल हे सारं तुम्ही खाली दिलेल्या माहितीमध्ये वाचू शकता.
Samsung Galaxy F05 ची किंमत भारतामध्ये 4 जीबी आणि 64 जीबी च्या कॉम्बिनेशनची किंमत 7999 रूपये आहे. 20 सप्टेंबर पासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी देशात खुला होणार आहे. फ्लिपकार्ट तसेच Samsung India च्या अधिकृत वेबसाईट वरून हा स्मार्टफोन विकत घेता येऊ शकतो. तसेच ऑफलाईन माध्यमातून रिटेल दुकानातूनही हा फोन विकत घेता येईल. या फोनची MSRP दहा हजार आहे पण हा फोन सवलतीसह लॉन्च करताना त्याची किंमत 8000 करण्यात आली आहे.
Samsung Galaxy F05 फोनचा स्क्रीन 6.7 इंच एच प्लस आहे. यामध्ये MediaTek Helio G85 चीपसेट असून ती 4 जीबी रॅम सह जोडलेली आहे. तर फोन मधील स्टोरेज हे 64 जीबी आहे. सॅमसंगच्या या फोन मध्ये रॅम वाढवण्याचा पर्याय आहे. अधिकची 4 जीबी रॅम वाढवता येऊ शकते. स्टोरेज वाढवण्यासाठी देखील microSD card ची मदत घेता येऊ शकते. हे स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. या सॅमसंगच्या फोनमध्ये Android 14-based One UI 5 आहे. सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, हा हॅन्डसेट दोन ओएस अपग्रेड्स आणि चार वर्ष सिक्युरिटी अपडेटसला सपोर्ट करते.
Samsung Galaxy F05 या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रेअर कॅमेरा आहे. यामध्ये 50 मेगा पिक्सेल प्रायमरी सेन्सर आहे. तर 2 मेगा पिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. तर फ्रंट कॅमेरा हा 8 मेगा पिक्सेलचा आहे. Samsung Galaxy F05 मध्ये 5,000mAh ची बॅटरी आहे तर चार्जर हा 25W wired आहे. यामुळे फोनचं फास्ट चार्जिंग होणार आहे. पण फोनच्या बॉक्समध्ये चार्जर दिला जाणार नाही. तसेच या स्मार्टफोनला यूएसबी टाईप सी पोर्ट आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये फेस लॉक फीचर आहे. फोनच्या मागील बाजूला लेदर पॅटर्न आहे. यामुळे या फोनला प्रिमियर लूक आला आहे. दरम्यान हा Samsung Galaxy F05 फोन ट्वायलाईट ब्लू (Twilight Blue)मध्ये उपलब्ध आहे.
सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा फोन बेसिक कनेक्टव्हिटी फीचर्ससह बाजारात आला आहे. Wi-Fi 5 (ac) आणि Bluetooth 5.3. ची कनेक्टीव्हिटी आहे. या फोनला कोणतेही NFC किंवा इन्फ्रारेड नाही, परंतु FM रेडिओ आहे. तो रेकॉर्डिंग पर्यायासह उपलब्ध आहे. हा फक्त 4G फोन आहे.
जाहिरात
जाहिरात