Google च्या आगामी Pixel 11a स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वी लीक झाले आहेत
Google आपल्या पुढील परवडणाऱ्या A-सीरिज स्मार्टफोनवर काम करत आहे. कथित Pixel 11a (संभाव्य स्मार्टफोन) संदर्भातील लीकमधून त्याचा प्रोसेसर, डिस्प्ले, बॅटरी, कॅमेरा आणि रंगांचे पर्याय समोर आले आहेत. टिपस्टरच्या माहितीनुसार, आगामी Google स्मार्टफोनमध्ये 6.3 इंचाचा 120Hz डिस्प्ले, कंपनीचा Tensor G6 SoC चिपसेट आणि 4,870mAh क्षमतेची बॅटरी मिळू शकते. चला, Google Pixel 11a चे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि इतर वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Google Pixel 11a कधी होणार लॉन्च
याआधीच्या रिपोर्ट्सनुसार, Pixel 11 लाइनअप ऑगस्ट 2026 च्या सुमारास सादर केला जाऊ शकतो. मात्र, A-सीरिज मॉडेल मार्च 2027 च्या आसपास अधिकृतपणे लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. सध्या Google ने लॉन्चच्या तारखेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
Google Pixel 11a स्पेसीफिकेशन (Expected)
टिपस्टर Mystery Leaks यांनी टेलिग्रामवरील एका पोस्टमध्ये Google Pixel 11a चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स उघड केले आहेत. या कथित स्मार्टफोनचे अंतर्गत कोडनेम 'Formosan' असल्याचे सांगितले जात आहे. हा फोन आगामी Tensor G6 चिपसेटसह येऊ शकतो आणि हा चिपसेटही कदाचित याच फोनसोबत लॉन्च होईल. याशिवाय, प्रोसेसरसोबत Google ची Titan M3 सिक्युरिटी चिप देखील मिळू शकते, जी यापूर्वीच्या मॉडेल्समध्येही देण्यात आली होती.
Pixel 11a मध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. याचे 1080x2424 पिक्सेल रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 2,250 निट्स HDR ब्राइटनेस आणि 3,350 निट्स पीक ब्राइटनेस असू शकतो. तसे झाल्यास, हा फोन मागील Pixel A-सीरिज मॉडेल्सपेक्षा अधिक ब्राइट डिस्प्ले देईल. कारण Pixel 10a मध्ये 3,000 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस असलेला डिस्प्ले होता. तसेच Pixel 11a मध्ये Samsung च्या Exynos मॉडेमऐवजी MediaTek M90 मॉडेम दिले जाऊ शकते. त्यामुळे कनेक्टिव्हिटी, नेटवर्क स्थिरता आणि थर्मल परफॉर्मन्सशी संबंधित समस्या कमी होण्याची शक्यता आहे.
कॅमेरा सेटअपबाबत बोलायचे झाल्यास, Pixel 11a मध्ये नवीन फ्रंट-फेसिंग कॅमेरा सेन्सर मिळू शकतो, ज्याला अंतर्गत पातळीवर 'dokkaebi' असे कोडनेम देण्यात आले आहे. यामुळे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगचा अनुभव अधिक चांगला होऊ शकतो. मात्र, रिअर कॅमेऱ्यांबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. Google मिड-रेंज सेगमेंटमध्येही फ्लॅगशिप दर्जाचा कॅमेरा देऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. Pixel 11a मध्ये 8GB RAM मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच यात 4,870mAh क्षमतेची बॅटरी दिली जाऊ शकते. डिझाइनच्या बाबतीत हा स्मार्टफोन Obsidian (ब्लॅक), Olive (ग्रीन), Frost (पर्पल) आणि Fog (सिल्व्हर) अशा चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होऊ शकतो.
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy Watch 9 Leak Reveals Major Chipset Upgrade Before Galaxy Unpacked
Samsung Galaxy S26 FE, Galaxy Tab S12 Reportedly Spotted in Google App Listing, Hinting at Imminent Launch
Oppo Find X10 Series Leak Reveals Chipset, Display Details; Find X10 Pro Max Tipped to Get Dimensity 9600 Pro