मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 रोजी Google ने आपली Google Pixel 9 ही सिरीज लॉन्च केली. Google Pixel 9 मालिकेमध्ये Pixel 9, Pixel 9 Pro, Pixel 9 Pro XL, आणि Pixel 9 Pro Fold असे चार स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. Pixel 9 ही मालिका AI प्रणाली सोबतच Gemini ने समर्थित आहे. आजच्या या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत Pixel 9 Pro Fold ची वैशिष्ट्ये, किंमत आणि उपलब्धता.
Pixel 9 Pro Fold ची वैशिष्ट्ये.
Pixel 9 Pro Fold हा फोल्डेबल स्मार्टफोन असून या स्मार्टफोनमध्ये 2,076 x 2,152 पिक्सलच्या रिझोल्यूशन सोबतच 8 इंचाची LTPO OLED Super स्क्रीन देण्यात आली आहे. 120Hz रीफ्रेश रेटसोबतच आणि 2,700 nits पर्यंत कमाल तेजस्विता देण्यास हा डिस्प्ले सक्षम आहे. फोल्डेबल स्मार्टफोन असल्याने बाहेरील डिस्प्लेमध्ये 6.3 इंचाची OLED स्क्रीन आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1,080 x 2,424 पिक्सल आहे. बाहेरील स्क्रीन ही कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस 2 द्वारे संरक्षित करण्यात आली असून, ओरखडे आणि थेंबांपासून टिकाऊपणा प्रदान करू शकते.
Pixel 9 Pro Fold या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूस तीन कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 48 मेगापिक्सलचा वाईल्ड अँगल कॅमेरा, 10.8 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि 10.5 मेगापिक्सलचा अल्ट्रा व्हाईड कॅमेरा 20x च्या झूम क्षमतेसोबत बनविण्यात आला आहे. फोल्डेबल स्मार्टफोन असल्यामुळे यामध्ये दोन्ही डिस्प्लेवर दहा मेगापिक्सलचे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने यामध्ये Blur आणि Magic editing अशी वैशिष्ट्ये सुध्दा देण्यात आली आहेत.
Pixel 9 Pro Fold या स्मार्टफोनची बॅटरी ही 4650 mAh ची असून 45 वॅटच्या जलद चार्जिंग आणि Qi या वायरलेस चार्जर द्वारे समर्थित आहे. अति सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये चेहरा, फिंगरप्रिंट आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण जोडण्यात आले आहे. IPX8 रेटिंग मिळाल्याने हा स्मार्टफोन पाणी प्रतिरोधक आहे. पावसापासून सुरक्षेसोबतच पाण्यातील व्हिडिओ शूट करण्यासाठी हा स्मार्टफोन सक्षम आहे.
Pixel 9 Pro Fold ची किंमत आणि उपलब्धता.
Pixel 9 Pro Fold हा स्मार्टफोन 16GB आणि 256GB स्टोरेज या प्रकारामध्ये मोडतो, जो ऑब्सिडियन आणि पोर्सिलेन अशा दोन वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. भारतामध्ये या स्मार्टफोनची किंमत 1,72,999 रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन जरी 14 ऑगस्ट रोजी लॉन्च झाला असला तरीसुध्दा त्याला खरेदी करण्यासाठी तुम्हाला 22 ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. Flipcart आणि Amazon सारख्या वेबसाइट सोबतच Croma आणि Reliance Digital सारख्या अन्य रिटेल स्टोअर्सवर सुध्दा खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त दिल्ली आणि बंगळुरू येथे स्थित असलेल्या गुगलच्या केंद्रावर देखील Pixel 9 Pro Fold खरेदीसाठी उपलब्ध आहे.