मागील जुलै महिन्यातच Honor या स्मार्टफोन कंपनीने त्यांचा फोल्डेबल स्मार्टफोन म्हणजेच Honor Magic V3 चीन मध्ये रिलीज केला आहे त्यामुळे आता चाहत्यांना हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत केव्हा लॉन्च होईल याची उत्सुकता लागली आहे. पण हा स्मार्टफोन केव्हा लॉन्च होणार ह्याबद्दल कोणतीही स्पष्टता न देता आता वेगळीच बातमी समोर आली आहे. ती म्हणजे Geekbench या वेबसाइट वर FCP-N49 या मॉडेल नंबरचा Honor Magic V3 स्मार्टफोनची नोदणी दिसून येत आहे. Octa Core Processor ने समर्थित असलेल्या या स्मार्टफोनला Single Core चाचणीमध्ये 1914 गुण तर Multi Core चाचणीमध्ये 5354 गुण मिळाले आहेत.
Honor Magic V3 या स्मार्टफोनने IMDA आणि TDRA ही दोन प्रमाणपत्रे देखील मिळवली आहेत, ज्यावरून आपल्या लक्षात येते की Honor या ब्रँडने सिंगापूर आणि UAE मध्ये पदार्पण करण्याची योजना बनवली आहे. आम्हाला यापूर्वीच माहित आहे की, Honor ची युरोपियन बाजारपेठांमध्ये देखील हा स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी आहे. Geekbench या वेबसाइट वर झालेल्या Honor Magic V3 च्या नोंदणीमुळे त्याबद्दल बरीचशी माहिती समोर येते. चला तर बघुयात, या फोल्डेबल स्मार्टफोनची वैशिष्ट्ये.
Honor Magic V3 ची वैशिष्ट्ये.
सर्वात आधी पाहूया Honor Magic V3 या स्मार्टफोनचा मुख्य डिस्प्ले. जो 6.45 इंचाचा असून, फोल्डेबल स्मार्टफोन असल्यामुळे तो 7.92 इंचापर्यंत वाढवता येऊ शकतो. 344 x 2,156 पिक्सेल FHD+ रिझोल्युशन सोबतच 120Hz LTPO चा रिफ्रेश रेट, डॉल्बी व्हिजन आणि HDR व्हिव्हिडचे समर्थन करणारा आहे. या डिस्प्ले ची तेजस्विता 5000nits पर्यंत वाढवता येऊ शकते.
Snapdragon 8 Gen 3 या प्रोसेसर द्वारे समर्थित असलेला हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित असलेल्या Magic OS 8.0.1 चे देखील समर्थन करतो. Honor Magic V3 या स्मार्टफोनची बॅटरी ही 5150 mAh ची असून 66W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंगचे समर्थन करते.
स्मा्टफोनच्या उजव्या बाजूस देण्यात आलेला फिंगरप्रिंट स्कॅनर हा पावर की मध्येच एकीकृत करण्यात आला आहे. Honor Magic V3 हा IPX8 ने प्रमाणित आहे, जो 2.5 मीटर पर्यंत पाणी प्रतिरोधक क्षमता प्रदान करतो. या स्मार्टफोनची कमाल रॅम क्षमता ही 16GB इतकी असणार असून स्टोरेज क्षमता 512GB आणि मायक्रोएसडी सह 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते.
Honor Magic V3 च्या मागील बाजूस तीन कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा असून यामध्ये OIS सह मुख्य सेन्सर, 40 मेगापिक्सलचा अल्ट्रा व्हाईड कॅमेरा, 100x क्षमतेचा डिजिटल झूम आणि OIS सह 50 मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा ज्यामध्ये परिस्कॉप टेलीफोटो लेन्स सुध्दा बसविण्यात आली आहे. सोबतच सेल्फी काढण्यासाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सुद्धा देण्यात आला आहे.