Flipkart Freedom Sale: iPhone 17 च्या किमतीवर थेट ₹ 5000 ची सवलत!

iPhone 17 मध्ये 6.3 -इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले आहे

Flipkart Freedom Sale: iPhone 17 च्या किमतीवर थेट ₹ 5000  ची सवलत!
महत्वाचे मुद्दे
  • iPhone 17 मध्ये 6.3-इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर ओएलईडी डिस्प्ले आहे.
  • iPhone 17 मध्ये Apple मध्ये A19 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • iPhone 17 मध्ये 48 मेगापिक्सल प्राइमरी फ्यूजन कॅमेरा दिला आहे
जाहिरात

Flipkart ने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आजपासून सर्वांसाठी Flipkart Freedom Sale सुरू केली आहे. फ्लिपकार्ट फ्रीडम सेलमध्ये Apple iPhone 17 मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. जर तुम्ही लेटेस्ट आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. iPhone 17 मध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी फ्यूजन कॅमेरा आणि 18 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. आयफोन 17 वर मिळणाऱ्या ऑफरपासून डिस्काउंट आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती देत आहोत.

iPhone 17 प्राइस आणि स्पेसीफिकेशन

iPhone 17 चे 256GB स्टोरेज व्हेरिएंट फ्लिपकार्टवर ₹81,900 मध्ये लिस्टेड आहे. हा आयफोन सप्टेंबर, 2026 मध्ये ₹82,900 मध्ये लॉन्च झाला होता.फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ₹4,000 ची सूट मिळू शकते, त्यानंतर किंमत ₹67,850 होईल. हा आयफोन लॉन्च किमतीच्या तुलनेत ₹5,000 स्वस्त मिळत आहे. याशिवाय एक्सचेंज ऑफरमध्ये जुने किंवा सध्याचे डिव्हाइस दिल्यास ₹60,800 पर्यंत किंमत कमी होऊ शकते. मात्र, एक्सचेंज ऑफरचा जास्तीत जास्त फायदा एक्सचेंजमध्ये दिलेल्या डिव्हाइसच्या क्वालिटीवर अवलंबून असतो.

iPhone 17 फीचर आणि स्पेसीफिकेशन

iPhone 17 मध्ये 6.3 इंचांचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 2622x1206 पिक्सेल, रिफ्रेश रेट 120Hz आणि 3,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. या आयफोनमध्ये Apple चा A19 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हा आयफोन ऑपरेटिंग सिस्टमसाठी iOS 26 सह येतो. कनेक्टिव्हिटी ऑप्शन्समध्ये iPhone 17 मध्ये NFC, GPS, 5G, Wi-Fi 7, eSIM सपोर्ट, Bluetooth 6 आणि USB Type-C पोर्ट मिळतो.

कॅमेरा सेटअपच्या बाबतीत iPhone 17 च्या रियरमध्ये f/1.78 अपर्चरसह 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी फ्यूजन कॅमेरा आणि f/2.2 अपर्चरसह 48 मेगापिक्सेलचा फ्यूजन अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी f/1.9 अपर्चरसह 18 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. डायमेंशनबद्दल सांगायचे झाल्यास, iPhone 17 ची रुंदी 71.5 मिमी, उंची 149.6 मिमी, डेप्थ 7.95 मिमी आणि वजन 177 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा : 
https://marathi.gadgets360.com/others/flipkart-freedom-sale-best-deals-on-43-inch-smart-tv-under-25000-news-11888874

#नवीनतम कथा
  1. Amazon Freedom Sale 2026: टॉप सिक्युरिटी कॅमेऱ्यांवर शानदार डील्स, किंमत ₹1,799 पासून सुरू
  2. Motorola भारतात आणत आहे Moto G Max, ७०००mAh बॅटरी, ५०MP दोन कॅमेरे, IP64 रेटिंग, १४ ऑगस्टला होणार लॉन्च
  3. Flipkart Freedom Sale: iPhone 17 च्या किमतीवर थेट ₹ 5000 ची सवलत!
  4. amazon great freedom sale: 40000 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या स्प्लिट एसीवर सर्वोत्तम डील्स
  5. झाकीर खानचा ‘पहला पहला’ खुलासा! गोपाल दत्तच्या पॉडकास्टमध्ये खास संवाद
  6. Flipkart Freedom Sale: ₹25 हजारांखाली 43-इंच स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट
  7. भारतात 43, 50, 55आणि 65 इंच प्रीमियम डिस्प्ले व्हू ग्लो मिनी-एलईडी टीव्ही लॉन्च, किंमत ₹42,५500 पासून सुरू
  8. Flipkart Freedom Sale: फक्त ₹399 पासून मिळवा 10,000mAh बॅटरीचे दमदार पॉवरबँक
  9. Flipkart Freedom Sale: ₹25 हजारांखाली 43-इंच स्मार्ट TV वर बंपर डिस्काउंट!
  10. ₹30 हजारांच्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट! Flipkart Freedom Sale मध्ये स्वस्तात खरेदीची संधी
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »