Amazon Great Freedom Sale 2026 मध्ये बँक ऑफर्ससह OnePlus 15 वर उत्तम डील्स मिळत आहेत.
जर तुम्ही OnePlus 15 खरेदी करायचा प्लॅन करत असाल, तर Amazon Great Freedom Sale 2026 ही तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते. नुकतीच कंपनीने मेमरी कॉस्ट वाढल्याचे कारण देत या फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली होती. मात्र आता Amazon सेलदरम्यान बँक ऑफर्स आणि इतर डिसकाउंट देत हा फोन सध्याच्या किंमतीपेक्षा कमी दरात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने टीझरद्वारे फोनवरील सुरुवातीच्या डीलची माहिती दिली आहे. याशिवाय HDFC बँक कार्ड, Amazon Pay ICICI बँक कार्ड, नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर्ससारखे अतिरिक्त फायदेही ग्राहकांना मिळणार आहेत.
Amazon च्या टीझरनुसार, OnePlus 15 चा 12GB + 256GB व्हेरिएंट सेलदरम्यान 81,999 रुपयांत खरेदी करता येणार आहे. ही किंमत बँक ऑफर दरम्यान असणार आहे. Amazon च्या माहितीनुसार, फोनच्या सध्याच्या 89,999 रुपयांच्या MRP च्या तुलनेत ग्राहकांना 8,000 रुपयांपर्यंत बचत करता येईल.
Amazon Great Freedom Sale दरम्यान HDFC Bank च्या क्रेडिट कार्ड आणि EasyEMI व्यवहारांवर 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. तसेच Amazon Pay ICICI Bank क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 5% अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. याशिवाय ग्राहकांसाठी नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर्स देखील उपलब्ध असतील, ज्यामुळे फोनची प्रभावी किंमत आणखी कमी होऊ शकते.
OnePlus 15 मध्ये 6.78 इंचाचा FHD+ (1,272x2,772 पिक्सेल्स) 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1Hz ते 165Hz रिफ्रेश रेटदरम्यान स्विच होऊ शकतो आणि 1800 निट्स पीक ब्राइटनेस ऑफर करतो. हा BOE Flexible Oriental OLED पॅनल असून, 330Hz टच सॅम्पलिंग रेट, Dolby Vision आणि 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट सपोर्ट करतो.
फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट देण्यात आला असून, यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये f/1.8 अपर्चर आणि OIS सपोर्टसह 50MP मुख्य कॅमेरा, f/1.8 अपर्चर, OIS आणि 3.5x ऑप्टिकल झूम असलेला 50MP पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स तसेच f/2.0 अपर्चर असलेला 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स समाविष्ट आहे. OnePlus 15 मध्ये Hasselblad-ट्यून केलेली कॅमेरा सिस्टीम असून, ती 8K रिझोल्यूशनपर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकते. सेल्फीसाठी फोनमध्ये f/2.4 अपर्चरसह 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
OnePlus 15 ची बेस्ट फीचर म्हणजे बॅटरी होय. या फोनमध्ये 7300mAh बॅटरी देण्यात आली असून, ती 120W वायर्ड फास्ट चार्जिंग, 50W वायरलेस चार्जिंग, 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंग आणि 5W रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय यात मॅग्नेट चार्जिंग सपोर्ट देखील आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर, IR Blaster, NFC आणि स्टीरिओ स्पीकर्स यांसारखी फीचर्स मिळतात. या डिव्हाइसला IP68 + IP69 रेटिंग देण्यात आली असून, त्याचे माप 161.42x76.67x8.10 मिमी आणि वजन 211 ग्रॅम आहे.
हे सुद्धा वाचा :
जाहिरात
जाहिरात
Apple Watch Series 12
Starts from ₹56,900
Samsung Galaxy Watch Ultra 2
Starts from ₹64,150
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹41,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹38,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm)
Starts from ₹40,999
Googlebook Render Leaked Again Ahead of Launch; Reveals Slim Profile