Photo Credit: iQOO
iQOO Neo 10R 5G भारतामध्ये लवकरच लॉन्च होण्याचा अंदाज आहे. दरम्यान टिप्सस्टरच्या माहितीनुसार, आता कंपनी 30 हजार पेक्षा स्वस्त किंमतीमध्ये नवा स्मार्टफोन आणण्याच्या विचारात आहे. हा फोन iQOO Neo 10 series चा भाग असण्याचा अंदाज आहे. iQOO Neo 10 series मध्ये Neo 10 आणि Neo 10 Pro चा समावेश आहे. सध्या तो केवळ चीन मध्ये उपलब्ध आहे. iQOO Neo 10R 5G भारतामध्ये Qualcomm च्या Snapdragon 8s Gen 3 chipset सह आणि 12 जीबी रॅम सह लॉन्च होण्याच्या तयारीमध्ये आहे.
X वर केलेल्या पोस्ट वर Paras Guglani (@passionategeekz) ने सविस्तर माहिती दिली आहे. iQOO Neo 10R 5G च्या डेब्यूची माहिती देण्यात आली आहे. टिप्सस्टरच्या माहितीनुसार, हा फोन भारतामध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यंत लॉन्च होऊ शकतो. एकदा लॉन्च झाला की तो दोन रंगांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. तो Blue White Slice आणि Lunar Titanium मध्ये उपलब्ध असेल.
फोनची किंमत पाहता भारतात तो 30 हजार पेक्षा कमी रूपयांमध्ये उपलब्ध होऊ शकतो असा अंदाज आहे. त्याची स्पर्धा बाजारामध्ये Motorola Edge 50 Pro,new Poco X7 Pro सोबत आहे. दरम्यान iQOO चा नवा फोन या प्राईज कॅटेगरी मध्ये येणार का? याची माहिती समजू शकलेली नाही.
iQOO Neo 10R 5G हा आगामी स्मार्टफोन 6.78-inch AMOLED screen सह येण्याचा अंदाज आहे. model number ‘I2221' सह तो येऊ शकतो. या फोनमध्ये Snapdragon 8s Gen 3 chipset असू शकते. तर दोन रॅम व्हेरिएंट्स असू शकतात. स्टोरेज क्षमता 8GB+256GB आणि 12GB+256GB असू शकते.
फोनच्या कॅमेर्याचा विचार करता त्यामध्ये 50 megapixel Sony LYT-600 sensor आणि 8 megapixel ultra wide angle shooter असू शकतो. iQOO Neo 10R 5G ला 80W चा फास्ट चार्जिंग आणि 6,400mAh बॅटरी पॅक चा अंदाज आहे.
जाहिरात
जाहिरात