Motorola Razr 50s च्या फीचर्सची झलक आली समोर पहा कसा असेल हा फोल्डेबल स्मार्टफोन

Motorola Razr 50s च्या फीचर्सची झलक आली समोर पहा कसा असेल हा फोल्डेबल स्मार्टफोन

Photo Credit: Motorola

Motorola Razr 50s may join the Razr 50 and Razr 50 Ultra in the company's lineup

महत्वाचे मुद्दे
  • Geekbench benchmark platform वर Motorola Razr 50s आला आहे
  • स्मार्टफोनने single-core test मध्ये 1,040 points
  • हा Android 14 वर चालणारा स्मार्टफोन आहे
जाहिरात

Motorola कडून मागील जून महिन्यात Razr 50 आणि Razr 50 Ultra लॉन्च केल्यानंतर यामध्येच आता अजून एक नवा फोन लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे. Razr 50 चा नवा फोल्डेबल स्मार्टफोन Motorola Razr 50s ची आता प्रतिक्षा आहे. Lenovo च्या मालकीच्या कंपनीचा हा आगामी फोल्डेबल स्मार्टफोन आहे. ऑनलाईन माध्यमात आता या स्मार्टफोन बद्दल असलेल्या अपेक्षांची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या चीपसेट, रॅम आणि अन्य फीचर्सची आता चर्चा सुरू झाली आहे. या स्मार्टफोन मध्ये रॅम 8 जीबी ची आहे. तर ऑपरेटिंग सिस्टीम Android 14 आहे. दरम्यान Motorola Razr 50s हा स्मार्टफोन HDR10+ certification website वर दिसला आहे त्यामुळे Moto Razr 50s ला आधीपासूनच HDR10+ प्रमाणपत्र मिळाले आहे, याचा अर्थ असा की स्मार्टफोन चा HDR10+ compatible display आहे.

91Mobiles च्या रिपोर्टनुसार, Motorola Razr 50s हा स्मार्टफोन Geekbench 6 cross-platform benchmark site वर स्पॉट झालेला आहे. यामध्ये मदरबोर्ड ‘aito'आहे तर ARMv8 architecture असणार आहे. या फोनचा प्रोसेसर 8 कोअर्सचा आहे. या स्मार्टफोनच्या चीपसेट बद्दल माहिती देण्यात आलेली नाही. Razr 50 ला जगभर MediaTek Dimensity 7300X SoC चा सपोर्ट असणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, हा स्मार्टफोन Android 14 वर चालणार आहे. तर रॅम 7.28GB असण्याचा अंदाज आहे. लिस्टिंग नुसार, Motorola Razr 50s मध्ये Geekbench single-core आणि multi-core tests मध्ये स्कोअर हा 1,040 आणि 3,003 points आहे. हे आकडे Razr 50 Ultra च्या Geekbench स्कोअरला अंडरकट करतात असे दिसते Gadgets 360 द्वारे केलेल्या चाचण्यांमध्ये या स्मार्टफोनला 1,926 आणि 4,950 गुण मिळाले आहेत.

Gadgets 360 च्या स्टाफ मेंबर्स कडून Geekbench 6.3.0 scores व्हेरिफाय करू शकले नाहीत. Motorola Razr 50s चा स्कोअर 889 हा single precision test मधील आहे तर half-precision आणि quantised scores पाहता तो अनुक्रमे 887 आणि 1895 पॉईंट्स आहे.

फोन लॉन्च झाल्यानंतर Motorola Razr 50 आणि Razr 50 Ultra च्या फ्लॅगशीप मध्ये clamshell-style foldable smartphones येणार आहे.

कोआला ग्रे (Koala Grey),सॅन्ड क्रीम (Sand Cream),आणि स्प्रिट्झ ऑरेंज
(Spritz Orange)या तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे.

फोटोज पाहता Razr 50s मध्ये Razr 50 च्या तुलनेत आतील आणि बाहेरील दोन्ही डिस्प्लेवर अगदी समान बेझल्स असतील. बाहेरील डिस्प्लेचा aspect ratio देखील पूर्वीच्या स्मार्टफोन सारखाच आहे. आता 27 सप्टेंबरला हा स्मार्टफोन रीलीज होण्याची शक्यता आहे. लिस्टिंग मध्ये Razr 50s चे इतर कोणतेही हार्डवेअर कॉन्फिगरेशन समोर आलेले नाहीत. पण हा स्मार्टफोन Razr 50 पेक्षा परवडणार्‍या किंमतीत अपेक्षित आहे. खर्च कमी करण्यासाठी काही वैशिष्ट्ये कमी केली आहेत. त्यामुळे आताच याबदद्ल तर्क वितर्क लावणं घाईचं आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »