भारतातून वनप्लस बाहेर पडत नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
भारतातून वनप्लस OnePlus कंपनी बाहेर पडणार असल्याच्या चर्चांवर अखेर कंपनीने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने स्पष्ट केले की, भारत हा तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा बाजार असून देशातील व्यवसाय, विक्री, विक्रीनंतरची सेवा (After Sales Service), वॉरंटी आणि सॉफ्टवेअर अपडेट्स यामध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे भारतातील ग्राहकांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नसल्याचे कंपनीने सांगितले आहे.
मात्र, OnePlus सॉफ्टवेअर धोरणात मोठा बदल होणार आहे. आतापर्यंत कंपनीच्या स्मार्टफोन्समध्ये वापरले जाणारे OxygenOS हळूहळू बंद करून त्याऐवजी OPPO चे ColorOS आधारित सॉफ्टवेअर वापरले जाणार आहे. कंपनीच्या मते, या बदलामुळे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अधिक सुलभ होईल, अपडेट्स जलद मिळतील आणि एकूणच सॉफ्टवेअरची गुणवत्ता सुधारेल.
गेल्या काही दिवसांपासून वनप्लस अमेरिका आणि युरोपमधून व्यवसाय गुंडाळत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर भारतातूनही कंपनी माघार घेणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, कंपनीने या सर्व दाव्यांचे खंडन करत भारतातील व्यवसाय पूर्ववत सुरू राहणार असल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सॉफ्टवेअर बदलला तरी वापरकर्त्यांचा अनुभव कायम ठेवण्यावर भर असेल. तसेच सुरक्षा अपडेट्स, नवीन फीचर्स, ग्राहक सेवा आणि वॉरंटीमध्ये कोणताही फरक पडणार नाही. त्यामुळे विद्यमान वनप्लस ग्राहकांना त्यांच्या फोनच्या वापरात कोणताही मोठा अडथळा येणार नसल्याचा कंपनीचा दावा आहे.
हे सुद्धा वाचा :
https://marathi.gadgets360.com/mobiles/oneplus-n6x-india-launch-teased-budget-smartphone-could-pack-a-massive-8-000mah-battery-news-11779375
जाहिरात
जाहिरात
Apple Watch Series 12
Starts from ₹56,900
Samsung Galaxy Watch Ultra 2
Starts from ₹64,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹41,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹38,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm)
Starts from ₹40,999
iQOO Pad Ultra Set to Launch on September 29; Design, Key Specifications Revealed