Oppo या स्मार्टफोन कंपनीने भारतात नुकताच आपला नवीन स्मार्टफोन Oppo A3 5G लॉन्च केला आहे. हा एक स्वस्त आणि मस्त असा परवडणारा स्मार्टफोन जरी असला, तरी सुध्दा या स्मार्टफोनचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या स्मार्टफोनला मिळालेले मिलिटरी शॉक रेजिस्टेंसचे प्रमाणपत्र. यावेळी Oppo इथवरच थांबलेला नाही आहे, तर पाणी, धूळ आणि विविध प्रकारच्या द्रव पदार्थांपासून सुध्दा संरक्षण देण्यासाठी विविध प्रमाणपत्र मिळवण्यात यशस्वी झाला आहे. चला तर मग बघुयात, काय आहेत Oppo A3 5G ची वैशिष्ट्ये किंमत उपलब्धता आणि यावरील सवलती.
Oppo A3 5G ची वैशिष्ट्ये.
OPPO A3 5G या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला HD+ रिझोल्यूशन सोबत 6.67-इंचाचा LCD डिस्प्ले बसविण्यात आलेला आहे. हा डिस्प्ले स्क्रीनला 1000 nits पर्यंत तेजस्विता प्रदान करण्यास सक्षम आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 या चिपसेट द्वारे समर्थित असून 5G कनेक्टिव्हिटीचे देखील समर्थन करतो. हा स्मार्टफोन एक बजट फ्रेंडली स्मार्टफोन जरी असला तरीसुद्धा, यामध्ये 5100 mAh ची बॅटरी बसविण्यात आली आहे, जी 45 वॅटच्या जलद चार्जिंगचे समर्थन करते.
Oppo A3 5G या स्मार्टफोनची ची रॅम ही 6 GB पर्यंत असून स्टोरेज क्षमता ही 128 GB पर्यंत आहे. स्टोरेज क्षमता आणि रॅमच्या आधारे हा स्मार्टफोन फक्त एकाच प्रकारामध्ये मोडतो. हा स्मार्टफोन MediaTek Dinmensity 6300 या चीपसेट चे देखील समर्थन करतो. Oppo A3 5G या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्या बद्दल पहायचे ठरवले तर, यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सुध्दा देण्यात आला आहे.
Oppo A3 5G या स्मार्टफोनच्या कने्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 5, Bluetooth v5.3 आणि GPS चा देखील समावेश आहे. स्मार्टफोनच्या खालील बाजूस USB पोर्ट देखील देण्यात आले आहे. Oppo या स्मार्टफोन कंपनीने असेही स्पष्ट केले आहे की, या स्मार्टफोनच्या झालेल्या चाचण्यांनंतर हा स्मार्टफोन तीन वर्षांच्या सलग वापरानंतर सुध्दा चांगला अनुभव देईल.Oppo A3 5G ची किंमत, उपलब्धता आणि ऑफर्स.
Oppo A3 5G हा स्मार्टफोन 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजच्या प्रकारामध्ये मोडतो, ज्याची किंमत भारतामध्ये 15,999 रुपये इतकी आहे. नेबूला लाल आणि समुद्री निळा अशा दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी सध्या Oppo च्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे. त्यासोबतच जर तुम्ही बँक ऑफ बडोदा, OneCard आणि SBI बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला 1,600 रुपयांची सूट देखील मिळणार आहे. यासोबतच जर Oppo A3 5G हा स्मार्टफोन तुम्ही Mobikwik वॉलेटचा वापर करून खरेदी करत आहात तर तुम्हाला 500 रुयांपर्यंतचा कॅशबॅक देखील कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर मिळू शकतो.