Oppo Reno 15C हा 12GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 512GB स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करू शकते असे म्हटले जाते.
Photo Credit: Oppo
Oppo Reno 15C 19 डिसेंबरला चीनमध्ये येणार असल्याचे वृत्त अपुष्ट आहे अजून.
Oppo Reno 15C हा चीन मध्ये डिसेंबर महिन्यात लॉन्च होणार आहे. चिनी स्मार्टफोन निर्मात्याने मेकर्सने सुरुवातीला त्यांच्या Reno 15 लाइनअपचे अनावरण करताना हँडसेटच्या लाँचिंगची घोषणा केली होती. त्यावेळी कंपनीने फक्त स्मार्टफोनच्या डिझाइनचीच घोषणा केली होती, तर त्याचे फीचर्स गुलदस्त्यात ठेवले होते. आता, आगामी हँडसेट चीनमधील एका सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये त्याची लाँचिंग तारीख आणि विविध तांत्रिक फीचर्स उघड झाली आहेत. तो तीन रंगांमध्ये आणि दोन रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये ऑफर केला जाईल असे म्हटले जाते.
Gizmochina च्या एका अहवालात म्हटले आहे की, आगामी Oppo Reno 15C हा स्मार्टफोन चीन टेलिकॉम वेबसाइटवर PMD110 या मॉडेल क्रमांकासह दिसला आहे. या यादीत हँडसेटबद्दल विविध तपशील उघड झाले आहेत, ज्यामध्ये त्याची लाँच तारीख, प्रमुख फीचर्स, रंगसंगती आणि रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन यांचा समावेश आहे.
Oppo Reno 15C हा 19 डिसेंबर रोजी चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल असे वृत्त आहे, परंतु कंपनीकडून याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. यात 1.5K (1,256x2,760 pixels)resolution आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.59 इंचाचा डिस्प्ले असू शकतो. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असू शकतो, ज्यामध्ये 50 MP शूटर, 50 MP सेकंडरी कॅमेरा आणि 8 MP कॅमेरा असू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी हँडसेटमध्ये 50 MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील मिळू शकतो. Oppo Reno 15C ऑरोरा ब्लू, अकादमी ब्लू आणि स्टारलाईट बो रंगांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.
Oppo Reno 15C हा 12GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 512GB स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करू शकते असे म्हटले जाते. याव्यतिरिक्त, प्रकाशनात दावा केला आहे की हा फोन Qualcomm च्या Snapdragon 7 Gen 4 चिपसेटसह लिस्ट होता.
अलीकडेच, एका टिपस्टरने Oppo Reno 15C चे प्रमुख स्पेसिफिकेशन्स उघड केले, जे चायना टेलिकॉम लिस्टिंगमध्ये दिसलेल्या फीचर्सशी सुसंगत होते. त्याच्या लाँचची टीझिंग करताना, स्मार्टफोन निर्मात्याने सांगितले की हा फोन Reno 15 सीरीजमधील "एंट्री-लेव्हल" आणि अधिक परवडणारा पर्याय म्हणून ठेवला जाईल. डिझाइनच्या बाबतीत, Oppo Reno 15C मध्ये चौकोनी रियर कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यामध्ये तीन लेन्स असतील. येत्या काही दिवसांत ब्रँडकडून फोनबद्दल अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे.
जाहिरात
जाहिरात
Neutrino Detectors May Unlock the Search for Light Dark Matter, Physicists Say
Uranus and Neptune May Be Rocky Worlds Not Ice Giants, New Research Shows
Steal OTT Release Date: When and Where to Watch Sophie Turner Starrer Movie Online?
Murder Report (2025): A Dark Korean Crime Thriller Now Streaming on Prime Video