Oppo Reno 15c मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात दोन 50 मेगापिक्सेल सेन्सरसह 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स देखील आहे.
Photo Credit: Oppo
Oppo Reno 15C स्मार्टफोनला धूळ पाण्यापासून संरक्षणासाठी IP66 IP68 IP69 रेटिंग आहे
Oppo ने चीनमध्ये त्यांचा नवा फोन, Oppo Reno 15c लॉन्च केला आहे. यामध्ये कंपनीने Snapdragon 7 Gen 4 चा समावेश केला असून अनेक कमालचे फीचर्स पहायला मिळाले आहेत. Reno 15 सीरीजमधील हा नवीन फोन 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह 6.59 इंचाचा डिस्प्ले, दोन 50 मेगापिक्सेल सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह इतर अनेक फीचर्स आहेत. हा फोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये 12 GB रॅम आणि 512 GB पर्यंत बिल्ट-इन स्टोरेज आहे. शिवाय, फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.Oppo Reno 15c ची किंमत,Oppo Reno 15c च्या बेस व्हेरिएंटची किंमत CNY 2899 पासून सुरू होते म्हणजेच सुमारे 37,000 रुपये ज्यामध्ये तुम्हाला 12GB RAM + 256GB स्टोरेज मिळते. 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 3199 चीनी युआन (सुमारे41,000 रुपये) आहे. हा फोन ऑरोरा ब्लू, कॉलेज ब्लू आणि स्टारलाईट बो रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Oppo Reno 15c मध्ये 6.59-इंचाचा फुल-एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 1200 निट्सची पीक ब्राइटनेस आहे. हा फोन 240Hz पर्यंतचा टच सॅम्पलिंग रेट आणि 460 पीपीआय पिक्सेल डेन्सिटी देते. हे Android 16 आधारित ColorOS 16 वर चालते आणि Snapdragon 7 Gen 4 चिपसेटद्वारे सपोर्टेड आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देखील आहे.
Oppo Reno 15c मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, जिथे OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. या फोनमध्ये OIS सह 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा देखील आहे. या डिव्हाइसमध्ये 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स देखील आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय, फोनमध्ये 6500mAh बॅटरी आणि 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. जास्त वापराच्या वेळी डाउनटाइम कमी करण्याच्या उद्देशाने ती देण्यात आली आहे.
इतर फीचर्समध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर, स्टीरिओ स्पीकर्स आणि एक्स-अॅक्सिस लिनियर मोटर यांचा समावेश आहे. हे ड्युअल सिम 5G, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.4, NFC, IR ब्लास्टर आणि USB-C पोर्टला सपोर्ट करते. 15c मध्ये ग्लास बॅक डिझाइन आहे आणि धूळ आणि पाण्याच्या रोखण्यासाठी IP66, IP68 आणि IP69 रेटिंग आहे.
जाहिरात
जाहिरात