Samsung Galaxy S26 Ultra मध्ये 5,000 mAh बॅटरी आणि quad-rear कॅमेरा युनिट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सुसंगत चार्जर वापरल्यास सॅमसंग गॅलेक्सी एस२५ अल्ट्रा ४५ वॅट्सवर चार्ज करता येतो.
Samsung Galaxy S26 Ultra सध्या डेव्हलप होत असून नव्या वर्षाच्या सुरूवातीला बाजारात लॉन्च होण्याची शक्यता आहे. या फोनच्या लाईनअप मध्ये Samsung Galaxy S26, Galaxy S26+ आणि Galaxy S26 Ultra यांचा समावेश असण्याचा अंदाज आहे. सध्या यामधील टॉप ऑफ द लाईन मॉडेल China Compulsory Certificate (3C) platform वर स्पॉट करण्यात आला आहे. त्यामधून फोनबाबतच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळण्यास मदत होत आहे. Samsung या फ्लॅगशिपमध्ये जलद चार्जिंग सुधारणा सादर करेल अशी अपेक्षा आहे. मागील Galaxy S Ultra स्मार्टफोन्सना 45W वायर्ड चार्जिंगपर्यंत मर्यादित ठेवण्यात आले होते. Galaxy S26 Ultra मध्ये 6.9 इंचाचा डिस्प्ले आणि Snapdragon 8 Elite Gen 5 असण्याची चर्चा आहे.
Samsung Galaxy S26 Ultra 3C लिस्टिंगमध्ये 60W Charging साठी सपोर्ट
मॉडेल क्रमांक SM-S9480 असलेला अद्याप घोषणा न झालेला Samsung Galaxy S26 Ultra 3C वेबसाइटवर Anvin (@ZionsAnvin) ने पाहिला आहे. लिस्टिंगच्या माहितीनुसार त्यामध्ये सर्वाधिक पॉवर आउटपुट 60W (20.0V DC, 3.0A) आहे. अलिकडच्या काळात इतर सॅमसंग स्मार्टफोन्सप्रमाणेच हे डिव्हाइस बॉक्समध्ये चार्जरशिवाय विकले जाईल. सॅमसंग 'सुपर फास्ट चार्जिंग 3.0' ब्रँडिंग अंतर्गत 60W वायर्ड फास्ट चार्जिंग सादर करण्याची अपेक्षा आहे. लीक झालेल्या One UI 8.5 फर्मवेअरवर ते 'लेव्हल 4' चार्जिंग म्हणून आधी पाहिले गेले होते.
Galaxy S26 Ultra च्या चार्जिंग स्पीडमध्ये 60W ची वाढ ही सॅमसंगच्या चार्जिंग स्ट्रॅटेजीमध्ये एक उल्लेखनीय सुधारणा ठरेल. Galaxy S25 Ultra, Galaxy S23 Ultra आणि Galaxy S24 Ultra मध्ये 45W वायर्ड चार्जिंगची मर्यादा होती. सॅमसंग जानेवारीमध्ये Galaxy S26 Ultra हा स्टँडर्ड आणि प्लस व्हेरिएंटसोबत लाँच करेल अशी अफवा आहे. यात 6.9 इंचाचा M14 QHD+ CoE डायनॅमिक AMOLED डिस्प्ले असू शकतो ज्यामध्ये 2600 निट्स ब्राइटनेस असू शकतो. हा फोन 256 जीबी, 512 जीबी आणि 1 टीबी ऑनबोर्ड स्टोरेज पर्यायांसह 16 जीबी रॅम पर्यायात लाँच होण्याची शक्यता आहे.
Galaxy S26 Ultra मध्ये 5,000 mAh बॅटरी आणि quad-rear कॅमेरा युनिट असण्याची शक्यता आहे. कॅमेरा सेटअपमध्ये 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 12 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स, 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स आणि 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड शूटर असू शकतो.
जाहिरात
जाहिरात
Vivo S50 and Vivo S50 Pro Mini Spotted on China Telecom Website Ahead of December 15 Launch
Tomb Raider Catalyst, Divinity, Star Wars Fate of the Old Republic: Everything Announced at The Game Awards