Narzo 90 सिरीज फोन Amazon आणि Realme India ऑनलाइन स्टोअरद्वारे भारतात खरेदीसाठी उपलब्ध असतील
Photo Credit: Realme
Narzo 90 सीरीजमधील दोन्ही फोनमध्ये AI Edit Genie, AI Editor, AI Eraser आणि AI Ultra Clarity सारखे अनेक AI टूल्स असतील
Realme Narzo 90 सीरीज भारतामध्ये डिसेंबर महिन्यात तिसर्या आठवड्यात लॉन्च होणार आहे. या सीरीज मध्ये Narzo 90 5G आणि Narzo 90x 5G चा समावेश आहे. हा लाईनअप देशात Amazon द्वारा विकला जाणार आहे. चीनी स्मार्टफोन कंपनी कडून नुकतेच या फोनचे डिझाईन टीज करण्यात्त आले आहेत. आगामी Narzo 90 सीरीज साठी एक खास मायक्रोसाईट अपडेट केली आहे. त्यामुळे या सीरीज मधील फोनचे वेगवेगळे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स कंफर्म झाले आहेत. दोन्ही हॅन्डसेट 7,000mAh बॅटरीवर चालणार आहेत. याशिवाय दोन्ही फोन मध्ये 60W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट असणार आहे.
अमेझॉनवरील आगामी Realme हँडसेटसाठी खास मायक्रोसाइट अपडेट करण्यात आली आहे, ज्यामध्ये त्यांचे प्रमुख स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. यामध्ये बॅटरी क्षमता, चार्जिंग स्पीड, कॅमेरा कॉन्फिगरेशन आणि डिस्प्ले फीचर्सचा समावेश आहे. Realme Narzo 90 5G आणि Narzo 90x 5G मध्ये 60W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 7,000mAh टायटन बॅटरी असेल. फक्त Narzo 90 5G बायपास चार्जिंग आणि वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करेल. स्टॅन्डर्ड मॉडेलमध्ये धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP66 + IP68 + IP69 रेटिंग देखील असेल.
बॅटरी लाइफच्या बाबतीत, Realme Narzo 90 5G एका चार्जवर 143.7 तासांचा म्युझिक प्लेबॅक, 8.1 तासांचा गेमिंग, 24 तासांचा ऑनलाइन व्हिडिओ प्लेबॅक आणि 28.2 तासांचा व्हिडिओ कॉलिंग देण्याचा दावा केला जातो.
Narzo 90x 5G मध्ये 17.1 तास नेव्हिगेशन, 23.6 तास ऑनलाइन व्हिडिओ प्लेबॅक, 27.7 तास मेसेजिंग, 61.3 तास कॉलिंग आणि 136.2 तास संगीत प्लेबॅक देईल.
दोन्ही Narzo 90 सिरीज फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी होल-पंच डिस्प्ले कटआउट्स देखील असतील. Realme Narzo 90 5G चा डिस्प्ले 4000 निट्स पर्यंत जाऊ शकतो, तर Narzo 90x 5G चा पॅनेल 1200 निट्स पर्यंत जाऊ शकतो आणि त्याचा रिफ्रेश रेट 144Hz असेल.
येणाऱ्या Realme Narzo 90 5G आणि Narzo 90x 5G मध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सेलचे प्रायमरी कॅमेरे असतील. Narzo 90 सीरीजमधील दोन्ही फोनमध्ये AI Edit Genie, AI Editor, AI Eraser आणि AI Ultra Clarity सारखे अनेक AI टूल्स असतील. Narzo 90 5G मध्ये 3 लेन्स असलेले चौकोनी रियर कॅमेरा मॉड्यूल असल्याचे दिसून येते, तर Narzo 90x 5G मध्ये आयताकृती डेकोरेशन असेल ज्यामध्ये दोन लेन्स असतील.
जाहिरात
जाहिरात
Neutrino Detectors May Unlock the Search for Light Dark Matter, Physicists Say
Uranus and Neptune May Be Rocky Worlds Not Ice Giants, New Research Shows
Steal OTT Release Date: When and Where to Watch Sophie Turner Starrer Movie Online?
Murder Report (2025): A Dark Korean Crime Thriller Now Streaming on Prime Video