Realme Neo 8 ला IP66+IP68+IP69 रेटिंगचा समावेश असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे.
Photo Credit: Realme
रियलमीने नुकताच चीनमध्ये कंपनीचा स्वतंत्र निओ मालिकेचा स्मार्टफोन, रियलमी निओ८ सादर केला.
Realme Neo 8 हा नवा स्मार्टफोन चीनमध्ये नुकताच लॉन्च झाला आहे. Neo series मधील हा नवा फोन तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. दरम्यान या फोनमध्ये 8,000mAh बॅटरीचा समावेश असून 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. Realme Neo 8 हा फोन Snapdragon 8 Gen 5 चीपसेटवर चालतो. त्यासोबत 16GB of RAM आणि 1TB of onboard storage आहे. या फोनमध्ये 6.78 इंच AMOLED display असून ट्रिपल रेअर कॅमेरा युनिट आहे. यामध्ये 50-megapixel primary sensor चा देखील समावेश आहे. तर Realme Neo 8 ला IP66+IP68+IP69 रेटिंगचा समावेश असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे.
Realme Neo 8 मध्ये ड्युअल सिम (नॅनो+नॅनो) आहे. हा Android 16 वर आधारित Realme UI 7.0 वर चालतो आणि त्यात 6.78-इंचाचा फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz पर्यंत आणि टच सॅम्पलिंग रेट 360Hz आहे. Samsung च्या M14 मटेरियल वापरून बनवलेला डिस्प्ले 3,800 nits पर्यंत ब्राइटनेस देतो असे म्हटले जाते. यात octa-core Snapdragon 8 Gen 5 चिपसेट, 16GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज आहे.
Realme ने या हँडसेटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला आहे. OIS सह 50 मेगापिक्सेलचा वाइड-अँगल कॅमेरा, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि OIS सह 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, 16 मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.
Realme Neo 8 मध्ये ऑथेंटिकेशनसाठी ultrasonic 3D fingerprint sensor आहे. स्क्रॅच आणि ड्रॉप रेझिस्टन्ससाठी यात क्रिस्टल आर्मर ग्लास आहे. सिग्नल लोकेशन ऑप्टिमायझेशनमध्ये सुधारित करण्यासाठी यात स्काय सिग्नल चिप S1 आहे.
Realme Neo 8 Variant किंमत (CNY) अंदाजे भारतीय रूपयामधील किंमत
12GB RAM + 256GB Storage CNY 2,399 Rs. 33,000
16GB RAM + 256GB Storage CNY 2,699 Rs. 35,000
12GB RAM + 512GB Storage CNY 2,899 Rs. 38,000
16GB RAM + 512GB Storage CNY 3,199 Rs. 41,000
16GB RAM + 1TB Storage CNY 3,699 Rs. 48,000
Realme Neo 8 सध्या चीनमध्ये सायबर पर्पल, मेक ग्रे आणि ओरिजिन व्हाइट पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy S26 Series Launch Timeline Seemingly Confirmed by Community Forum