Samsung Galaxy M15 5G Prime Edition मध्ये मिळणार व्हॉईस फोकस, ट्रीपल रेअर कॅमेरा; पहा अजून काय आहेत दमदार फीचर्स?

Samsung Galaxy M15 5G Prime Edition मध्ये मिळणार  व्हॉईस फोकस, ट्रीपल रेअर कॅमेरा; पहा अजून काय आहेत दमदार फीचर्स?

Photo Credit: Samsung

Samsung Galaxy M15 5G Prime Edition comes in Blue Topaz, Celestial Blue and Stone Grey shades

महत्वाचे मुद्दे
  • Samsung Galaxy M15 5G हा स्मार्टफोन Blue Topaz, Celestial Blue, आणि Grey
  • Samsung Galaxy M15 5G Prime Edition मध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा आहे
  • 4GB+128GB या व्हेरिएंटची किंमत 0,999 तर 8GB+128GB व्हेरिएंटसाठी Rs.13,499
जाहिरात

Samsung Galaxy M15 5G चा प्राईम एडिशन बुधवार (25 सप्टेंबर) ला भारतामध्ये लॉन्च झाला आहे. या फोन मध्ये फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ही Galaxy M15 5G प्रमाणेच असणार आहे. हा फोन भारतामध्ये एप्रिल 2024 मध्ये आला होता. या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6100+ SoC चा सपोर्ट आहे. तर 50 मेगा पिक्सेलचा ट्रिपल रेअर कॅमेरा आहे. फोनची रॅम 8 जीबी पर्यंत आहे तर बॅटरी 6,000mAh आहे. या स्मार्टफोन मध्ये 50 मेगा पिक्सेल ट्रिपल रेअर कॅमेरा मध्ये 13 मेगा पिक्सेल सेल्फी शूटर आहे. हा सॅमसंगचा फोन Android 14 वर चालतो तर OS upgrade करण्याची देखील संधी आहे.

Samsung Galaxy M15 5G Prime Edition ची भारतामधील किंमत काय?

Samsung Galaxy M15 5G Prime Edition ची भारतामधील किंमत 10,999 पासून सुरू होते. हा भारतामधील 4GB + 128GB या व्हेरिएंटचा फोन आहे. त्याच्या वर 6GB + 128GB व्हेरिएंट साठी 11,999 रूपये आणि 8GB + 128GB व्हेरिएंटसाठी Rs. 13,499 मोजावे लागणार आहेत. सॅमसंगचा हा स्मार्टफोन अमेझॉन, सॅमसंग इंडियाची वेबसाईट आणि काही निवडक रिटेल स्टोअर मध्ये विकत घेता येणार आहे.

Samsung Galaxy M15 5G Prime Edition कोणत्या रंगामध्ये उपलब्ध असणार आहे?

Samsung Galaxy M15 5G Prime Edition हा स्मार्टफोन Blue Topaz, Celestial Blue, आणि Stone Grey या तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Samsung Galaxy M15 5G Prime Edition ची स्पेसिफिकेशन काय असतील?

Samsung Galaxy M15 5G Prime Edition मध्ये स्मार्टफोन 6.5-inch full-HD+ असणार आहे. त्यामध्ये 1,080 x 2,340 pixels स्क्रीन असणार आहे. तर डीस्प्ले Super AMOLED display असणार आहे. 90Hz refresh rate असणार आहे. या स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 6100+ chipset असणार आहे. 8GB रॅम आणि 128 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज असणार आहे. हा स्मार्टफोन Android 14-based One UI 6.0.सोबत येणार आहे. यामध्ये 4 ओ एस अपग्रेड्स असतील. पाच वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स देखील मिळणार आहेत.

Samsung Galaxy M15 5G Prime Edition मध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा आहे. त्यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर आहे ज्यासोबत 5 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल सेंसर आहे. या फोनचा फ्रंट कॅमेरा 13 मेगा पिक्सेलच्या सेन्सरचा आहे.

दरम्यान सॅमसंगच्या या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने fingerprint sensor एका बाजूला असणार आहे. फोनमध्ये Knox Security आणि Quick Share features असणार आहे. तर व्हॉईस फोकस असणार आहे. यामुळे कॉल क्लिअ‍ॅरिटी असणार आहे. कनेक्टीव्हिटीचा विचार करता dual 5G, 4G LTE, GPS, Bluetooth 5.3 आणिUSB Type-C port आणि 3.5mm audio jack असणार आहे.

Galaxy M15 5G Prime Edition हा स्मार्टफोन 160.1 x 76.8 x 9.3mm या आकारात असणार आहे तर वजन 217 ग्राम असणार आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »