Photo Credit: Samsung
Samsung Galaxy S25 Series जानेवारी 2025 मध्ये बाजारात येण्याचा अंदाज आहे. तसेच या सीरीज मधील Galaxy S25 Ultra हा टॉप ऑफ द लाईन फोन असणार आहे. नुकत्याच जारी रिपोर्ट्स नुसार, फ्लॅगशीप हॅन्डसेट हे seamless software updates, सह येणार आहेत. यामध्ये Android ची A/B over-the-air (OTA) update system असणार आहे. कोणत्याही डाउनटाइमशिवाय अपडेट इन्स्टॉल होत असतानाही युजर्सला या कथित Galaxy S25 Ultra वापरणे सुरू ठेवण्याची परवानगी मिळणार आ हे.
रिपोर्ट्सनुसार, Android Authority च्या माहितीनुसार, Galaxy S25 Ultra मध्ये A/B OTA update system असणार आहे. या फोनच्या सीरीज मध्ये Galaxy S25 आणि Galaxy S25 Plus चा देखील समावेश असणार आहे.
tipster @chunvn8888,ने या अपडेट बद्दल माहिती नोव्हेंबर मध्येच दिली होती. तिच्यामते, Samsung Galaxy S25 series मध्ये seamless software updates मिळणार आहे.
Android मध्ये A/B update system आहे ती system storage वरील separate partitions ने काम करते. एकदा ट्रिगर झाल्यावर, अपडेटची installation प्रक्रिया सुरू होते ती इनअॅक्टिव्ह 'B' पार्टिशन वर, तर स्मार्टफोनची सिस्टिम 'A' पार्टिशन वर काम करते. याचे अनेक फायदे असल्याचा दावा केला जातो. सुरुवातीला, हे युजर्सना सॉफ्टवेअर अपडेट प्रक्रियेदरम्यान त्यांचे डिव्हाइस वापरत राहण्यास सक्षम करते, जेव्हा ते अपडेट केलेल्या डिस्क विभाजनामध्ये रीबूट होते तेव्हाच डाउनटाइम असतो.
जरी अपडेट अयशस्वी झाले किंवा हँडसेटमध्ये एरर आली, तरीही ते जुन्या विभाजनात किंवा OS मध्ये रीबूट होते, ज्यामुळे ते इनअॅक्टिव्ह स्थितीत पडण्याची शक्यता कमी होते ज्याला सामान्यतः‘bricking' म्हणून संबोधले जाते. युजर्स नंतर सॉफ्टवेअर अपडेट करण्याचा पुन्हा प्रयत्न करणे निवडू शकतात.
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मॉडेल क्रमांक SM-S938 सह कथित Samsung Galaxy S25 Ultra, Qualcomm च्या नव्या Snapdragon 8 Elite chipset सह सुसज्ज असेल, जो बाजारात प्रमुख मोबाइल SoC आहे.
जाहिरात
जाहिरात