सध्या Xiaomi ही स्मार्टफोन कंपनी त्यांच्या आगामी स्मार्टफोन्स म्हणजेच Xiaomi 15 आणि Xiaomi 15 pro वर काम करत आहे जेणेकरून ते ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च करता येतील. पण अद्यापही ह्या सिरिजचा पुढचा स्मार्टफोन Xiaomi 15 Ultra ऑक्टोबर मध्ये लॉन्च होईल की पुढच्या वर्षी हे स्पष्ट झालेले नाही. पण हा स्मार्टफोन केव्हा लॉन्च होणार ह्याची उत्सुकता सर्व चाहत्यांना लागली आहे, त्याचे कारण म्हणजे Xiaomi 15 Ultra चा 200 मेगापिक्सलचा कॅमेरा. चला तर मग पाहूया कॅमेऱ्यासोबतच काय आहेत ह्याची वैशिष्टये.
Xiaomi 15 Ultra ची वैशिष्ट्ये
Xiaomi 15 Ultra चे मुख्य वैशिष्ट्य असणार आहे तो म्हणजे ह्या स्मार्टफोनचा 200 मेगापिक्सलचा कॅमेरा. ज्यामध्ये 3.2x आणि 5x ऑप्टिकल झूम सोबत टेलिफोटो लेन्स सुद्धा देण्यात आली आहे. सोबतच 50 मेगापिक्सल चे चार सेन्सॉर सुध्दा बसविण्यात आले आहेत. स्मार्टफोनच्या मागील बाजूस देण्यात आलेला क्वाड कॅमेरा म्हणजेच चार कॅमेऱ्यांचा सेटअप हा जितका आकर्षक दिसतो, तितकेच लक्षणीय त्याचे फायदे असणार आहेत. मोबाईल फोटोग्राफी प्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, असे म्हणायला हरकत नाही. ह्या स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा हा 32 मेगापिक्सलचा असू शकतो.
ह्या स्मार्टफोनचा प्रोसेसर HyperOS 2.0 Android 15 var आधारित असून ह्यामध्ये Xiaomi 15 सीरीजच्या दोन स्मार्टफोन नंतर snapdragon 8 Gen 4 ह्या चीपसेटचा वापर होताना दिसून येईल. स्मार्टफोनच्या अति सुरक्षेसाठी अल्ट्रासोनिक ऑन स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. ह्यामध्ये 6200 mAh ची बॅटरी देण्यात आलेली असून ती वारंवार चार्ज न करता देखील बऱ्याच तासांपर्यंत चालू शकते. जी 90 वॅटच्या वायर चार्जिंग, 80 आणि 10 वॅटच्या वायरलेस चार्जिंगचे समर्थन करते.
Xiaomi 15 Ultra ह्या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.7 इंचाचा असून 3000nits ची तेजस्विता आणि 2k रेसोल्युशन सोबत दोन लेयर असलेला OLED पॅनल सुध्दा ह्यामध्ये बसविण्यात येणार आहे. ह्या स्मार्टफोनची रॅम 24GB असण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येते. ह्या स्मार्टफोन मधील बरीचशी वैशिष्ट्ये ही मार्च महिन्यामध्ये लॉन्च झालेल्या Xiaomi 14 Ultra ह्या स्मार्टफोन सारखीच आहेत, ज्याची किंमत 99,999 आहे. त्यामुळे Xiaomi 15 Ultra ह्या स्मार्टफोनकडून नवीन वैशिष्ट्यांची अपेक्षा चाहत्यांना आहे. सोबतच ह्या स्मार्टफोनची किंमत काही अंशी समान असेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.Xiaomi 15 Ultra केव्हा होणार लॉन्च
Xiaomi 15 Ultra हा स्मार्टफोन कंपनीकडून पुढच्या वर्षी जून 2025 पर्यंत संपूर्ण जगभरात लॉन्च करण्यात येईल असा अंदाज आहे. ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होणाऱ्या Xiaomi 15 आणि Xiaomi 15 pro सोबत किंवा त्यानंतर लगेचच हा स्मार्टफोन लॉन्च होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.