Photo Credit: Flipkart
2024 मधील सप्टेंबर महिना संपताच किंवा महिन्याच्या शेवटी आगामी नवरात्री आणि दिवाळीचे औचित्य साधून Flipkart Big Billion Days येत आहेत. Flipkart वरील या सेल मध्ये होणारी ही वार्षिक विक्री आगामी महत्वाच्या सणांच्या हंगामापूर्वी उत्पादनांच्या श्रेणी वर आकर्षक सवलत प्रदान करण्यात येणार आहे. Filpkart वर रिलीज झालेल्या एका प्रोमो मध्ये असे दिसून येत आहे की काही निवडक बँकांच्या क्रेडिट कार्ड सोबतच काही ब्रँड्स सोबतच भागीदारी करत फ्लिपकार्ट आकर्षक सवलती आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवणार आहे. चला तर मग बघुया, केव्हा सुरू होत आहे Flipkart Big Billion Days 2024 आणि काय आहेत यामधील विशेष सवलती.
Tipster वर लीक झालेल्या एका पोस्टर वरून असे लक्षात येते की, 26 सप्टेंबर 2024 पासून Flipcart Big Billion Days सुरू होत आहेत परंतु ते फक्त मर्यादित वापरकर्ते म्हणजेच फ्लिपकार्ट प्लस मेंबर्स साठी. त्यासोबतच सर्व फ्लिपकार्ट वापरकर्त्यांसाठी Flipcart Big Billion Days 27 सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्यात येत आहेत.
यामध्ये सर्वात महत्त्वाची ऑफर मिळणार आहे, HDFC क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना EMI आणि क्रेडिट कार्ड वापरून पेमेंट केल्याने विशेष सवलत देण्यात येणार आहे. एक्सचेंज ऑफरसोबतच फ्लिपकार्ट पे लेटर चा वापर केल्याने काही सवलती प्रदान केल्या जातील. तसेच Flipcart Plus Members सुपरकॉइन्स च्या मार्फत देखील अधिक सवलती प्राप्त करू शकतात.
iPhone 16 नुकताच लॉन्च झाल्याने iPhone 15 आणि iPhone 14 च्या उपलब्ध मॉडेल्स वर भारी सूट मिळण्याची अपेक्षा आहे. Apple, Samsung, Xiaomi, Vivo सारख्या विविध मोबाईल कंपनीच्या ब्रँड्स च्या मोबाईल आणि इयर पॉड्स वर भारी सूट देण्यात येणार आहे. कोणत्या ब्रँड्स चे कोणते मोबाईल आणि त्यावर किती रुपयांची सूट मिळणार आहे, हे येत्या काही दिवसांत आपल्याला समजणार आहे.
Flipkart Big Billion Days सुरू होताच अन्य वेबसाइट्स म्हणजेच Amazon सारख्या वेबसाईट वर सुध्दा सेल सुरू होणार आहेत. याचे कारण म्हणजे सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव तर सुरूच आहे पण जोपर्यंत आपण आपल्या लाडक्या बाप्पाला यावर्षी बाय म्हणू तोपर्यंत नवरात्र सुरू होत आहेत. आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर शॉपिंग तर व्हायलाच हवी कारण काही दिवसांवर दिवाळी सुध्दा आहे.
जाहिरात
जाहिरात