Google Creative Ads Lab India कडून डिजिटल पब्लिशर्संसाठी क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजी आणि जाहिरात मोहिमांना नवी दिशा

Google Creative Ads Lab India ने डिजिटल पब्लिशर्संना एकत्र आणत क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजी, जाहिरात मोहिमांचे नियोजन आणि नाविन्यपूर्ण डिजिटल जाहिरात विकसित करण्यासाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे.

Google Creative Ads Lab India कडून डिजिटल पब्लिशर्संसाठी क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजी आणि जाहिरात मोहिमांना नवी दिशा
महत्वाचे मुद्दे
  • गुगल क्रिएटिव्ह अॅड्स लॅब इंडियाचा डिजिटल प्रकाशकांसाठी विशेष उपक्रम
  • एआय आणि मार्केटिंग तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यशाळा.
  • प्रेक्षक केंद्रित जाहिरात मोहिम निर्मितीवर भर.
जाहिरात

The Google Creative Ads Lab India  या उपक्रमांतर्गत देशभरातील डिजिटल न्यूज पब्लिशर्संना जाहिरात धोरण, एआय, मार्केटिंग तंत्रज्ञान आणि  कॅम्पेन डेव्हलपमेंट आधारित विशेष प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात सहभागी पबलिशर्स टीमला प्रेक्षकांच्या आवडीनिवडींचे विश्लेषण, विचारांची मांडणी, जाहिरात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळांमध्ये प्रत्यक्ष व्यावसायिक उदाहरणांवर आधारित सराव सत्रांचाही समावेश होता.

कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात प्रत्येक सहभाग झालेल्या संस्थेला व्यावसायिक गरजांवर आधारित मोहिम संकल्पना तयार करून ती सादर करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील डिजिटल न्यूज पोर्टल मेडिकल डायलॉग्स यांना उत्कृष्ट सादरीकरण आणि संवाद यासाठी 'पिच इट' विजेते म्हणून गौरविण्यात आले. तसेच फॅक्ट क्रेसेंडो या संस्थेला गुगल क्रिएटिव्ह अॅड्स लॅब चॅम्पियन हा सन्मान प्रदान करण्यात आला.

या पुरस्कारांद्वारे कल्पना मांडणी, जाहिरात मोहिम अंमलबजावणी आणि अंतिम सादरीकरण अशा प्रक्रियेतील विविध टप्प्यांतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला. सहभागी प्रकाशकांनी कार्यशाळांमध्ये शिकविण्यात आलेल्या संकल्पना, आधुनिक साधन यांचा वापर करून प्रेक्षककेंद्रित आणि परिणामकारक जाहिरात उपाय विकसित केले.

या उपक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मार्केटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून कॅम्पेन नियोजन, कल्पनांची निर्मिती, कंटेंट डेव्हलपमेंट आणि सादरीकरण अधिक प्रभावी कसे करता येईल, यावर विशेष भर देण्यात आला. बदलत्या डिजिटल युगात नाविन्यपूर्ण जाहिरात धोरणे विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांमुळे डिजिटल प्रकाशकांना नवे कौशल्य आणि व्यावसायिक संधी उपलब्ध होणार असल्याचे कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. Google Creative Ads Lab India कडून डिजिटल पब्लिशर्संसाठी क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजी आणि जाहिरात मोहिमांना नवी दिशा
  2. भारतात 5G चा वेगाने विस्तार; ९९% जिल्ह्यांमध्ये हाय-स्पीड नेटवर्क
  3. सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन ४७ हजार रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाला, जाणून घ्या कसा होणार फायदा
  4. Vivo X300E उद्या होणार लॉन्च! Snapdragon 8 Gen 5, 7,200mAh बॅटरी आणि 50MP ट्रिपल कॅमेरासह दमदार एंट्री
  5. 20,000 पेक्षा कमी किंमतीत 120Hz डिस्प्ले असलेले सर्वोत्तम स्मार्टफोन्स; iQOO, Motorola हे आहेत टॉप पर्याय
  6. टेकप्रेमींसाठी गुड न्यूज! एकाच पॉवरबँकवर तीन डिव्हाइस चार्ज करण्याची सुविधा
  7. iQOO Z11 Lite vs Realme Narzo 100x 5G vs Moto G77 Power: कोणता 5G स्मार्टफोन ठरेल सर्वात फायदेशीर?
  8. AI स्मार्ट ग्लासेससाठी जगातील सर्वात छोटा मायक्रो फॅन लॉन्च! xMEMS च्या नव्या तंत्रज्ञानामुळे ओव्हरहिटिंगची समस्या होणार दूर
  9. OnePlus N6x भारतात 31 जुलैला लाँच! 7,000mAh बॅटरीसह 2.5 दिवसांचा बॅकअपचा दावा
  10. Oppo K15 लॉन्च! 50MP कॅमेरा, 8,000mAh दमदार बॅटरी आणि Dimensity 7360 Super चिपसह दमदार एंट्री
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »