Google Creative Ads Lab India ने डिजिटल पब्लिशर्संना एकत्र आणत क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजी, जाहिरात मोहिमांचे नियोजन आणि नाविन्यपूर्ण डिजिटल जाहिरात विकसित करण्यासाठी नवीन उपक्रम हाती घेतला आहे.
The Google Creative Ads Lab India या उपक्रमांतर्गत देशभरातील डिजिटल न्यूज पब्लिशर्संना जाहिरात धोरण, एआय, मार्केटिंग तंत्रज्ञान आणि कॅम्पेन डेव्हलपमेंट आधारित विशेष प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमात सहभागी पबलिशर्स टीमला प्रेक्षकांच्या आवडीनिवडींचे विश्लेषण, विचारांची मांडणी, जाहिरात आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळांमध्ये प्रत्यक्ष व्यावसायिक उदाहरणांवर आधारित सराव सत्रांचाही समावेश होता.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात प्रत्येक सहभाग झालेल्या संस्थेला व्यावसायिक गरजांवर आधारित मोहिम संकल्पना तयार करून ती सादर करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील डिजिटल न्यूज पोर्टल मेडिकल डायलॉग्स यांना उत्कृष्ट सादरीकरण आणि संवाद यासाठी 'पिच इट' विजेते म्हणून गौरविण्यात आले. तसेच फॅक्ट क्रेसेंडो या संस्थेला गुगल क्रिएटिव्ह अॅड्स लॅब चॅम्पियन हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारांद्वारे कल्पना मांडणी, जाहिरात मोहिम अंमलबजावणी आणि अंतिम सादरीकरण अशा प्रक्रियेतील विविध टप्प्यांतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला. सहभागी प्रकाशकांनी कार्यशाळांमध्ये शिकविण्यात आलेल्या संकल्पना, आधुनिक साधन यांचा वापर करून प्रेक्षककेंद्रित आणि परिणामकारक जाहिरात उपाय विकसित केले.
या उपक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मार्केटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून कॅम्पेन नियोजन, कल्पनांची निर्मिती, कंटेंट डेव्हलपमेंट आणि सादरीकरण अधिक प्रभावी कसे करता येईल, यावर विशेष भर देण्यात आला. बदलत्या डिजिटल युगात नाविन्यपूर्ण जाहिरात धोरणे विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांमुळे डिजिटल प्रकाशकांना नवे कौशल्य आणि व्यावसायिक संधी उपलब्ध होणार असल्याचे कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले.
जाहिरात
जाहिरात
WhatsApp Adds Status Caption Editing Feature for Android Beta Testers: Report