How to Charge Faster: फोन हळू चार्ज होतोय? 'ही' एक सोपी ट्रिक वापरा, चार्जिंगचा वेग वाढेल

फोन हा ओरिजनल चार्जरने करायला हवा. जेणेकरून फोनच्या चार्जिंगचा स्पीड योग्य राहील.

How to Charge Faster:  फोन हळू चार्ज होतोय? 'ही' एक सोपी ट्रिक वापरा, चार्जिंगचा वेग वाढेल
महत्वाचे मुद्दे
  • नेहमी वॉल सॉकेटमधील प्लग इनमध्ये चार्जर लावूनच फोन चार्ज करा
  • फोन चार्जिंगला लावलेला असताना बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले ॲप्स बंद करा.
  • फोन नेहमी ओरिजनल चार्जरनेच चार्ज करा.
जाहिरात

स्मार्टफोनचा वापर जर खूप जास्त होत असेल, तर तुम्हाला फोन दिवसातून अनेकदा चार्ज करावा लागतो. फोनची बॅटरी जलदरित्या चार्ज होत नसेल, तर तुमच्यासाठी ते त्रासदायक ठरू शकते. अनेकदा  आपल्या चुकांमुळे फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या फोनची बॅटरीही वेगाने चार्ज होत नाही. अशा वेळी फोनची बॅटरी लवकर चार्ज कशी करावी, हा प्रश्न असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. जर तुमचा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असेल, तर त्यासोबत मिळालेला चार्जिंग ब्रिक आणि केबल एकदा चेक करून घ्या आणि फोन नेहमी वॉल सॉकेटमध्ये प्लग करूनच चार्ज करा. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

फास्ट चार्जिंग होत नाही: मग काय करावे

तुमचा फोन सर्वप्रथम फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो का, हे चेक करून घ्या. यासाठी फोनसोबत मिळालेला बॉक्स, युजर मॅन्युअल किंवा इतर माहिती पाहू शकता. तसेच इंटरनेटवर तुमच्या फोनचा मॉडेल नंबर तपसून त्याची चार्जिंग स्पीडही तपासू शकता.

जर तुमचा फोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करत असेल, पण कंपनीने त्यासोबत आवश्यक क्षमतेचा चार्जिंग सेटअप (चार्जिंग ब्रिक आणि केबल) दिला नसेल, तर फोन फास्ट चार्ज होणार नाही. त्यामुळे तुमच्या फोनच्या चार्जिंग स्पीडनुसार योग्य चार्जिंग सेटअप वापरणे गरजेचे आहे.

अनेकजण वायरलेस चार्जिंग पॅड किंवा लॅपटॉपला केबल जोडून फोन चार्ज करतात. त्यामुळे फोन फास्ट चार्ज होत नाही. अशा वेळी फोनचा चार्जर थेट वॉल सॉकेटमध्ये लावूनच फोन चार्ज करावा.

काय करावे
नेहमी वॉल सॉकेटमध्ये चार्जर लावूनच फोन चार्ज करा.
फोन नेहमी ओरिजिनल चार्जरनेच चार्ज करा. (चार्जर खराब झाल्यास त्याच ब्रँडचा किंवा कंपनीने अधिकृत केलेला चार्जर वापरा.)
चार्जिंगदरम्यान बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले अॅप्स बंद करा.
फोन चार्ज करताना ब्लूटूथ आणि इंटरनेट बंद ठेवा.
काय करू नये
फास्ट चार्जिंग हवे असल्यास फोन वायरलेस चार्जिंग पॅडवर ठेवून चार्ज करू नका.
फास्ट चार्जिंग हवे असल्यास फोन लॅपटॉप किंवा पीसीला केबल जोडून चार्ज करू नका.
फोन चार्ज करताना त्याचा वापर करू नका.
फोन अतिउष्ण किंवा अतिथंड ठिकाणी ठेवू नका.
फोन चार्ज करताना ऑडिओ किंवा व्हिडिओ कॉल करू नका.

जर तुम्ही व्यवस्थित फोन चार्ज करत असाल, फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारा चार्जर आणि केबल वापरत असाल, तरीही फोन फास्ट चार्ज होत नसेल, तर कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन त्याची तपासणी करून घ्या. मात्र त्यापूर्वी वर सांगितलेल्या सर्व स्टेप फॉलो करतोय हे एकदा तपासून घ्या.   

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. How to Charge Faster: फोन हळू चार्ज होतोय? 'ही' एक सोपी ट्रिक वापरा, चार्जिंगचा वेग वाढेल
  2. Bank of Baroda ग्राहकांची माहिती लीक, बँकेकडून निवेदन जाहीर ; तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
  3. Vivo T5e vs Samsung Galaxy M17e 5G vs Realme P4 Lite 5G:कोणता मोबाईल सर्वात बेस्ट
  4. Samsung Galaxy Z Fold 6 वर तब्बल ₹19,000 ची सूट! फोल्डेबल फोन खरेदीची मोठी संधी
  5. लोक कोणते सिम खरेदी करत आहेत? समोर आली आकडेवारी
  6. चष्म्यात कॅमेरा, AI ट्रांसलेशन आणि म्यूजिक सपोर्ट! पेबलने भारतात लॉन्च केले Smart Glasses
  7. Vivo T5x 5G भारतात Fusion Red रंगात लॉन्च: प्राइस, फीचर्स
  8. बँका, UPI आणि सोशल मीडिया...काहीच सुरक्षित राहणार नाही? तज्ज्ञांच्या मते, पासवर्ड काही सेकंदात होणर क्रॅक
  9. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अवघ्या चार दिवसांत ४० लाख फॉलोअर्स, सेल्फी व्हिडिओला मिळाले लाखो व्ह्यूज
  10. Google Creative Ads Lab India कडून डिजिटल पब्लिशर्संसाठी क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजी आणि जाहिरात मोहिमांना नवी दिशा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »