Quantum Computer ना भविष्यातील सर्वात पावरफुल तंत्रज्ञानांपैकी एक म्हणून ओळखले जात आहे.
आज बँकिंग, ऑनलाइन पेमेंट, सरकारी सिस्टीम आणि खासगी डेटाची सुरक्षा ज्या एन्क्रिप्शन तंत्रज्ञानावर आधारित आहे, ते भविष्यात पूर्णपणे काम् करणे बंद होऊ शकते. इस्रायलचे प्रसिद्ध सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आणि तेल अवीव विद्यापीठाचे प्राध्यापक मेजर जनरल (निवृत्त) आयझॅक बेन-इजरायल यांचे म्हणणे आहे की, पूर्ण क्षमतेचा क्वांटम कॉम्प्युटर (Quantum Computer) तयार होताच आज वापरल्या जाणाऱ्या जवळपास सर्व एन्क्रिप्शन सिस्टीम काही क्षणांतच फोडल्या जाऊ शकतात. त्यांच्या मते, सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील हा सर्वात मोठा बदल ठरू शकतो.
बेन-इजरायल यांनी Jerusalem Post Podcast ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, सध्याचे पासवर्ड आणि एन्क्रिप्शन अल्गोरिदम हे पारंपरिक संगणक लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहेत. मात्र, क्वांटम कॉम्प्युटिंग आल्यानंतर त्यांची सुरक्षा फार काळ टिकू शकणार नाही. मात्र, या धोक्याला तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधीपासूनच काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सामान्य संगणक 0 आणि 1 म्हणजेच बायनरी सिस्टीमवर काम करतात, तर Quantum Computer क्वांटम बिट (Qubit) वापरतो. त्यामुळे तो एकाच वेळी अनेक संभाव्य गणना करू शकतो. प्राध्यापक बेन-इजरायल यांच्या मते, सध्याच्या सुपरकॉम्प्युटरला एखादे काम पूर्ण करण्यासाठी हजारो वर्षे लागली, तरी Quantum Computer ते अतिशय कमी वेळेत पूर्ण करू शकतो.
त्यांच्या मते, हा केवळ वेग वाढण्याचा विषय नाही, तर प्रोसेसिंग क्षमतेतील इतका मोठा फरक असेल की आजच्या एन्क्रिप्शन सिस्टीम त्यासमोर टिकू शकणार नाहीत.
तज्ज्ञांच्या मते, Quantum Computer थेट कोणत्याही सिस्टीममध्ये घुसखोरी करणार नाही, तर तो डेटा सुरक्षित ठेवणारे एन्क्रिप्शनच फोडेल. त्यामुळे पासवर्ड किंवा सिक्युरिटी कीज (Security Keys) यांचा अंदाज लावणे अत्यंत सोपे होऊ शकते. याच कारणामुळे जगभरातील सरकारे आणि तंत्रज्ञान कंपन्या आतापासूनच Post-Quantum Cryptography वर काम करत आहेत.
बेन-इजरायल यांच्या मते, याचा गैरवापर रोखण्यासाठी पहिला उपाय म्हणजे असे नवीन एन्क्रिप्शन अल्गोरिदम विकसित करणे, जे Quantum Computer देखील सहज फोडू शकणार नाहीत. असे अल्गोरिदम उपलब्ध असले तरी त्यांचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार होण्यासाठी वेळ लागेल आणि संपूर्ण उद्योगक्षेत्राला ते लागू करण्यासाठी सुमारे 10 वर्षे लागू शकतात.
दुसरा पर्याय म्हणजे क्वांटम कम्युनिकेशन (Quantum Communication). यामध्ये Quantum Entanglement सारख्या तंत्रज्ञानाच्या मदतीने डेटा पाठवण्याच्या संकल्पनेवर काम सुरू आहे. या तंत्रज्ञानात पारंपरिक सिग्नल ट्रान्समिशन होत नसल्याचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे मध्येच डेटा इंटरसेप्ट करणे अत्यंत कठीण होऊ शकते.
प्राध्यापकांनी हेही सांगितले की, चीनने Quantum Communication संबंधित प्रयोगांसाठी आधीच एक उपग्रह प्रक्षेपित केला आहे. तर तेल अवीव विद्यापीठानेही या दिशेने प्राथमिक संशोधनाचा भाग म्हणून एक सैटेलाइट अवकाशात पाठवला आहे.
जाहिरात
जाहिरात