iPad Pro 2025 लाइनअपमध्ये सेल्युलर डेटा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी Apple C1X मॉडेम आणि Wi-Fi 7 support सक्षम करणारी N1 नेटवर्किंग चिप देखील आहे.
Photo Credit: Apple
iPad Pro M5 मध्ये 11” साठी 31.29Wh, 13” साठी 38.99Wh बॅटरी आणि फास्ट चार्जिंग आहे
अॅपल कडून लेटेस्ट M5 chip असलेल्या iPad Pro 2025 lineup ची घोषणा 15 ऑक्टोबरला झाली आहे. या नव्या लाईन अप मध्ये 11 आणि 13 इंच स्क्रिन साईज असलेल्या आयपॅड्सचा समावेश आहे. 2024 च्या लाइनअपच्या तुलनेत, जे M4 चिप्सवर चालणारे होते, त्यात सुधारित कामगिरी, कनेक्टिव्हिटी, डिस्प्ले सपोर्ट आणि सिस्टम सॉफ्टवेअर आहे. iPad Pro 2025 लाइनअपमध्ये सेल्युलर डेटा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी Apple C1X मॉडेम आणि Wi-Fi 7 support सक्षम करणारी N1 नेटवर्किंग चिप देखील आहे.
iPad Pro M5 सध्या प्री ऑर्डर्स साठी खुला झाला असून 22 ऑक्टोबरपासून विक्री सुरू होईल. iPad Pro 2025 लाईनअप हा ऑनलाईन आणि रिटेल स्टोरर्स मधून खरेदी करता येणार आहे. मुंबई, दिल्ली, बेंगलूरू आणि पुणे येथील अॅपलच्या रिटेल आऊटलेट्स मध्येही ते उपलब्ध असतील.
iPad Pro M5 13-inch ची Cellular + Wi-Fi मॉडेल्सची Rs 149,900 पासून होते तर टॉप मॉडेल Rs 259,900 मध्ये मिळणार आहे. iPad Pro M5 13-inch (Wi-Fi only) मॉडेलची रेंज Rs 129,900 पासून सुरू होते. 16GB RAM + 2TB storage (Nano texture glass)साठी ग्राहकांना Rs 239,900 मोजावे लागतील. iPad Pro M5 11-inch (Cellular + Wi-Fi) ची किंमत Rs 119,900 पासून सुरू होते आणि Rs 229,900 पर्यंत आहे तर iPad Pro M5 11-inch (Wi-Fi only) मॉडेल 99,000 पासून सुरू होते आणि Rs 209,900 पर्यंत आहे. हा आयपॅड काळा आणि चंदेरी रंगात उपलब्ध असेल.
iPad Pro M5 मध्ये Ultra Retina XDR display असून तो Anti-reflective coating सह येणार आहे. 256GB, 512GB, 1TB, 2TB चार स्टोरेज पर्याय आणि 12GB, 16GB रॅम असणार आहे. हे आयपॅड iPadOS 26 वर चालतील. यामधील कॅमेरा 12MP wide कॅमेरासह तर Landscape 12MP Center Stage camera सह असणार आहे. iPad Pro M5 मध्ये 31.29Wh (11-inch model)साठी तर 38.99Wh (13-inch model) साठी बॅटरीचा समावेश करण्यात आला आहे. त्याला फास्ट चार्जिंग चा पर्याय आहे. ज्यामध्ये 30 मिनिटांत 50% चार्जिंग होते.
जाहिरात
जाहिरात
Google Says Its Willow Chip Hit Major Quantum Computing Milestone, Solves Algorithm 13,000X Faster
Garmin Venu X1 With 2-Inch AMOLED Display, Up to Eight Days of Battery Life Launched in India