Photo Credit: Infinix
Infinix या स्मार्टफोन कंपनीने Infinix XPad LTE हा टॅबलेट लॉन्च केला आहे. या टॅबलेट चे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले क्वाड स्पीकर्स. त्यासोबतच कंपनीचे आपल्या या नवीन टॅबलेट बद्दल स्पष्ट मत आहे की, हा टॅबलेट एक मनोरंजन केंद्रित टॅबलेट असणार आहे. Infinix ने आपला हा नवीन टॅबलेट भारतात शुक्रवार दिनांक 13 सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च केला आहे. हा नवीन टॅबलेट विविध प्रकारच्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. चला तर मग बघुयात, काय आहेत Infinix XPad LTE या टॅबलेट ची वैशिष्ठ्ये, किंमत आणि उपलब्धता.
Infinix XPad LTE या टॅबलेट मध्ये 4G सिम कार्डचे समर्थन देण्यात आले आहे. त्यासोबतच यामध्ये 1200 x 1920 पिक्सलच्या रिझोल्यूशन सोबत 11 इंचाचा full HD+ डिस्प्ले आणि 90Hz चा रिफ्रेश रेट ज्यामध्ये 83 टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो आणि 440 nits ची पीक तेजस्विता देण्यात आली आहे. Infinix चा हा टॅबलेट Octa Core 6nm वर आधारित असलेल्या MediaTek Helio G99 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे.
Infinix XPad LTE या टॅबलेट मध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज जोडण्यात आला आहे. तसेच मायक्रोएसडी कार्डद्वारे या टॅबलेट ची स्टोरेज क्षमता 1TB पर्यंत वाढवता येते. या टॅबलेटमध्ये मागील बाजूस एलईडी फ्लॅश लाईट आणि 8 मेगापिक्सलचा रियर प्राथमिक कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.
Infinix XPad LTE या टॅबलेट ची मेटल युनिबॉडी डिझाइन सोबतच याचे वजन 496 ग्रॅम इतके आहे. या टॅबलेटची जाडी 7.58mm इतकी ठेवण्यात आली आहे. त्याचे क्वाड स्पीकर्स DTS ऑडिओ प्रोसेसिंग आणि चार ध्वनी मोड वापरण्यास सक्षम आहेत. Infinix XPad LTE या टॅबलेट मध्ये 7000mAh ची बॅटरी ती 18 वॅटच्या चार्जिंग चे समर्थन करते.
भारतात Infinix XPad LTE या टॅबलेट ची 4GB आणि 128GB या प्रकाराची किंमत 10,999 रुपये पासून सुरू होणारा आहे. हा टॅबलेट जरी लॉन्च झाला असला तरीसुद्धा, तो खरेदीसाठी 26 सप्टेंबरपासून फ्लिपकार्ट या वेबसाईट वर दुपारी 12 वाजता कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नव्याने लॉन्च झालेला हा टॅबलेट टायटन गोल्ड, स्टेलर ग्रे आणि फ्रॉस्ट ब्लू अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
जाहिरात
जाहिरात