सॅमसंग गॅलेक्सी टॅब एस९ हा अॅमेझॉनवर 35,999 रुपयांना उपलब्ध आहे, जो त्याच्या मूळ किंमती 81,999 रुपयांपेक्षा खूपच कमी आहे.
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२५: प्राइम सदस्यांना २४ तासांचा खास लवकर प्रवेश मिळेल
ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2025 भारतात 23 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, मोबाईल अॅक्सेसरीज, लॅपटॉप, टॅबलेट, हेडफोन आणि ऑडिओ डिव्हाइसेस यांसह विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादने आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. ॲमेझॉन प्राईम मेंबर्सना यामध्ये विशेष सुविधा मिळणार असून, त्यांना 22 सप्टेंबरपासून म्हणजे सेलच्या 24 तास आधीच ऑफर्सचा लाभ घेता येईल.अमेझॉनच्या या सेलपूर्वीच काही लोकप्रिय टॅबलेट्सवर सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सॅमसंग गॅलेक्सी Tab S9 या सेलमध्ये 35,999 रूपयांना उपलब्ध आहे. लॉन्चच्या वेळेस या टॅबची मूळ किंमत 81,999 रूपये होती तर Xiaomi Pad 7 ची किंमत 30,999 रूपये करण्यात आली आहे. या टॅबची मूळ किंमत 39,999 रूपये होती. याशिवाय, ॲपल iPad 11 (A16 चिपसह) देखील या सेलमध्ये असणार आहे. तसेच, iPad Air 3 ची किंमत 59,900 रूपयांऐवजी 50,000 रूपयांच्या आत ठेवली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे, मात्र नेमकी किंमत अद्याप जाहीर झालेली नाही.
ग्राहकांना ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल मध्ये SBI क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10% इन्स्टंट डिस्काउंट आणि अमेझॉन पे द्वारे अतिरिक्त कॅशबॅकसह अतिरिक्त बचतीचा फायदा घेता येईल. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड यूजर्स देखील विशेष सवलतींसाठी पात्र आहेत. याव्यतिरिक्त, ग्राहकांना त्यांच्या जुन्या टॅब्लेटमध्ये ट्रेड करून एक्सचेंज ऑफरचा लाभ घेता येईल. यामध्ये नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील आहेत.
मॉडेल | लिस्ट प्राईज | सेल प्राईज |
OnePlus Pad 3 | Rs. 49,999 | Rs. 47,999 |
Samsung Galaxy Tab S9 | Rs. 81,999 | Rs. 35,999 |
Apple iPad 11 (A16 chip) | Rs. 34,900 | Rs. 33,999 |
Redmi Pad Pro 5G | Rs. 29,999 | Rs. 25,906 |
Lenovo Tab M11 with Pen | Rs. 31,000 | Rs. 13,990 |
Galaxy Tab S9 FE | Rs. 44,999 | Rs. 34,999 |
Xiaomi Pad 7 | Rs. 30,999 | Rs. 39,999 |
जाहिरात
जाहिरात