iQOO Pad 5e मध्ये 12.1 इंच डिस्प्ले आहे सोबत 2.8K resolution आणि 144Hz refresh rate आहे.
Photo Credit: iQOO
iQOO Watch GT 2 मध्ये २.०७-इंचाचा डिस्प्ले असेल
iQOO 15 या महिन्याच्या अखेरीपर्यंत चीन मध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे. या फोनसोबतच अन्य काही प्रोडक्ट्स देखील लॉन्च केली जाणार आहे. यामध्ये iQOO Pad 5e tablet, iQOO Watch GT 2, आणि iQOO TWS 5 earbuds चा समावेश आहे. iQOO ने आगामी प्रोडक्ट्स साठी प्री ऑर्डर्स आधीच सुरू केल्या आहेत. iQOO Pad 5e मध्ये Snapdragon 8s Gen 3 chipset चा समावेश आहे. त्यामध्ये 12.1-inch display असणार आहे. iQOO Pad 5e, Watch GT 2, TWS 5 लॉन्च होणार 20 ऑक्टोबरलाiQOO Pad 5e, iQOO Watch GT 2 आणि iQOO TWS 5 चीनमध्ये 20 ऑक्टोबरला लॉन्च होणार आहेत. कंपनीने याबाबत Weiboवर पोस्ट करत माहिती दिली आहे. हा लॉन्च सोहळा चीन मधील स्थानिक वेळ 7 वाजता तर भारतीय स्थानिक वेळ संध्याकाळी 4.30 च्या सुमारास सुरू होईल. कंपनीचा फ्लॅगशीप स्मार्टफोन iQOO 15 देखील याच सोहळ्यात लॉन्च होणार आहे.
iQOO कडून सध्या टॅबलेट्स, इयरफोन्स आणि स्मार्टवॉचेस यांच्या प्री-ऑर्डर्स चीन वेबसाईट वरून घेण्यास सुरूवात झाली आहे. iQOO Pad 5e हा हिरव्या रंगामध्ये उपलब्ध आहे. त्याच्या मागच्या बाजूला circular camera module आहे.
iQOO Pad 5e मध्ये Snapdragon 8s Gen 3 chipset असणार आहे. यामध्ये 12.1 इंच डिस्प्ले आहे सोबत 2.8K resolution आणि 144Hz refresh rate आहे. या टॅबलेट मध्ये 10,000mAh बॅटरीचा देखील समावेश आहे.
iQOO Watch GT 2 मध्ये 2.07-इंचाचा डिस्प्ले असेल आणि तो BlueOS ऑपरेटिंग सिस्टमसह येईल. यामध्ये एक गेमिंग मोड असेल आणि एकदा चार्ज केल्यानंतर तो 33 दिवसांपर्यंत चालेल असा दावा केला जात आहे. शेवटी, iQOO TWS 5 इयरफोन्स गेमिंगसाठी 60db अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) आणि 42ms लेटन्सी रेट देण्यासाठी टीझ केले आहेत.
20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या लाँचिंग इव्हेंटमध्ये iQOO 15 हा मुख्य आकर्षण असेल. हा फोन नव्याने लाँच झालेल्या Snapdragon 8 Elite Gen 5 chipset वर चालेल आणि त्यात 144Hz refresh rate सह 6.85-inch 2K 8T LTPO सॅमसंग "" डिस्प्एव्हरेस्टले असेल. या फोनमध्ये कंपनीचा Q3 gaming chipset असेल.
जाहिरात
जाहिरात