OnePlus Pad 2 वर जारी डिस्काऊंट्स आणि ऑफर्स काय?

OnePlus Pad 2 मध्ये Snapdragon 8 Gen 3 chipset आहे

OnePlus Pad 2 वर जारी डिस्काऊंट्स आणि ऑफर्स काय?

Photo Credit: OnePlus

OnePlus Pad 2 comes in a Nimbus Gray colourway

महत्वाचे मुद्दे
  • OnePlus Pad 2 मध्ये मेन कॅमेरा 13-megapixel चा आहे
  • टॅबलेट मध्ये Android 14-based OxygenOS 14 skin आहे
  • OnePlus Pad 2 मध्ये 9,510mAh बॅटरी आहे सोबतच 67W charging अ‍ॅडाप्टर आहे
जाहिरात

OnePlus Pad 2 हा भारतामध्ये जुलै महिन्यात यंदाच्या वर्षी लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये Qualcomm ची Snapdragon 8 Gen 3 SoC आहे तर 9,510mAh बॅटरी आहे. सोबत 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग आहे आणि 12.1-inch 3K LCD screen आहे. या टॅबलेट मध्ये Nimbus Gray हा रंग उपलब्ध असून तो 8GB + 128GB आणि 12GB + 256GB पर्यायासह उपलब्ध आहे. या टॅबलेट ला OnePlus Stylo 2 stylus सोबत जोडलेले आहे. तर OnePlus Smart Keyboard आहे जो ग्राहकांना वेगळा विकत घ्यावा लागतो. सध्या मर्यादित कालावधी साठी कंपनीने हा टॅबलेट डिस्काऊंटेड दरामध्ये उपलब्ध केला आहे.

OnePlus Pad 2 ची भारतामधील डिस्काऊंट नंतर किंमत काय?

OnePlus Pad 2 ची भारतामधील किंमत लॉन्चच्या वेळेस 8GB + 128GB या पर्यायासाठी Rs. 39,999 होती. तर 12GB + 256GB व्हेरिएंट ची किंमत Rs. 42,999 होती. सध्या सुरू असलेल्या मर्यादित कालावधीच्या डिस्काऊंट मध्ये OnePlus Pad 2 हा Rs. 37,999 आणि Rs. 40,999, या किंमतीमध्ये उपलब्ध असणार आहे. ही ऑफर 6 नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपर्यंत उपलब्ध असणार आहे. ग्राहकांना हे डिल Amazon सोबतच OnePlus India website वर उपलब्ध असणार आहे.

ऑफर मध्ये ग्राहकांना अधिकचे फायदे देखील मिळणार आहेत. ग्राहकांना ICICI, RBL आणि Kotak Mahindra Bank क्रेडिट कार्ड वापरल्यास 3 हजार रूपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. यामध्ये no-cost EMI चा देखील पर्याय मिळणार आहे. 9 महिन्यांसाठी हे ईएमआय असणार असून त्यामध्ये दरमहा ईएमआय 4555 असणार आहे. ग्राहकांना 5 हजारांपर्यंत exchange bonus देखील मिळणार आहे.

OnePlus Pad 2 ची स्पेसिफिकेशन, फीचर्स काय

OnePlus Pad 2 मध्ये 12.1-inch 3K (2,120 x 3,000 pixels) LCD display आहे. तर 144Hz refresh rate, 303ppi pixel density, 900nits of peak brightness level आहे. तर Dolby Vision support आहे. यामध्ये Snapdragon 8 Gen 3 चीपसेट असून तो 12GB of LPDDR5X RAM सोबत जोडलेला आहे आणि UFS3.1 onboard storage हा 256GB पर्यंत वाढवता येतो. दरम्यान या फोनमध्ये Android 14-based OxygenOS 14 आहे.

OnePlus 2 मध्ये 13-megapixel रेअर कॅमेरा आणि 8-megapixel फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे. यामध्ये Bluetooth 5.4, Wi-Fi 7, dual-band Wi-Fi,आणि USB Type-C connectivity आहे. टॅबलेट मध्ये 9,510mAh बॅटरी आहे. तर 7W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. यामध्ये Hi-Res certified six-speaker system आणि facial recognition फीचर आहे. या फोनचा आकार 268.66 x 195.06 x 6.49mm आहे. वजन 584g आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Amazon ने भारतात लॉन्च केला Fire TV Stick 4K Select, Vega OS सह येणार खास फीचर्स
  2. Nothing चा नवीन Phone 3a Lite आला बाजारात, पारदर्शक डिझाइन आणि Glyph लाइट खास आकर्षण
  3. Oppo Enco X3s आले बाजारात, 55dB ANC आणि लाँग बॅटरीसह पहा खास फीचर्स काय?
  4. OnePlus 15 भारतात पदार्पणासाठी सज्ज; अत्याधुनिक Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट असणार
  5. Moto G67 Power च्या भारतातील लॉन्च डेटची घोषणा; 7,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा हायलाइट
  6. iQOO Neo 11 सिरीजमध्ये मिळणार फ्लॅगशिप परफॉर्मन्स; Snapdragon 8 Elite आणि 8K कूलिंग टेक्नॉलॉजी
  7. Redmi Turbo 5 लवकरच होणार लॉन्च? 7,500mAh बॅटरी, 6.5-इंच 1.5K डिस्प्लेची चर्चा
  8. Realme C85 Pro लवकरच होणार लॉन्च? Geekbench लिस्टिंगमध्ये Snapdragon 685 आणि Android 15 सह येण्याची शक्यता
  9. Oppo Find X9 Pro मध्ये 7,500mAh बॅटरी, 200MP टेलिफोटो लेन्स; पहा Find X9 Series मध्ये खास काय?
  10. Samsung Galaxy S26 सिरीजमध्ये Connectivity साठी मिळणार स्वतंत्र Exynos Chip
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »