249 नंतर आता एअरटेलचा 299 रूपयांचा प्लॅन हा एअरटेलच्या ग्राहकांसाठी आता सर्वात स्वस्त प्लॅन आहे.
Photo Credit: REUTERS
एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर आहे
परवडणाऱ्या शॉर्ट टर्म रिचार्जचे दिवस आता संपल्याची चिन्हं आहेत. Reliance Jio ने त्यांचा 249 रुपयांचा लोकप्रिय प्रीपेड प्लॅन बंद केल्यानंतर, Bharti Airtel कडूनही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत 249 रुपयांचा पर्याय बंद केला आहे. एअरटेलचा सर्वात सोपा entry-level recharge मानल्या जाणाऱ्या या प्लॅनमध्ये एक बॅलेन्स पॅकेज देण्यात आले होते ज्यात 1GB रोजचा डेटा, अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स, तसेच दररोज 100 एसएमएस यांचा समावेश होता. या प्लॅनची वैधता 24 दिवस होती, ज्यामुळे मोठ्या काळासाठी पॅक न घेता बजेट-फ्रेंडली प्लॅन हवा असलेल्या यूजर्ससाठी हा एक उत्तम पर्याय बनला होता.
Airtel Thanks app वर मात्र देण्यात आलेल्या एका सूचनेमुळे ही बाब स्पष्ट झाली आहे की, 20 ऑगस्ट 2025 पासून, एअरटेलचा 249 चा रिचार्ज बंद केला जाईल. याबाबत कंपनीने स्पष्ट जाहीर केले आहे. दरम्यान याची जाहीर घोषणा झाल्याने या विधानामुळे संशयाला फारशी जागा उरली नाही आणि आतापासून, ग्राहकांना एअरटेलच्या रिचार्ज कॅटलॉगमध्ये हा पर्याय मिळणार नाही.
Reliance Jio ने त्यांचे दोन सर्वात परवडणारे प्रीपेड प्लॅन बंद केले आहेत, ज्यामुळे लाखो ग्राहकांसाठी एंट्री-लेव्हल मर्यादा वाढली आहे. टेलिकॉम कंपनीने त्यांचे 209 रुपयांचे पॅक (22 दिवस, 1 जीबी/दिवस) आणि 249 रुपयांचे पॅक (28 दिवस, 1 जीबी/दिवस) बंद केले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना जिओचा 299 रुपयांचा नवीन ऑनलाइन सुरुवातीचा पर्याय उपलब्ध होईल. या पॅकमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा आणि 28 दिवसांची वैधता आहे, ज्यामुळे हा सध्या जिओच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेला सर्वात कमी किमतीचा रिचार्ज आहे.
सध्या, एअरटेलने बंद केलेल्या उत्पादनासाठी नवा थेट रिप्लेसमेंट आणलेला नाही. कंपनीने उच्च किमतीच्या बिंदूवर असाच प्लॅन परत येईल का याबद्दलही माहिती दिलेली नाही. पण हे पाऊल भारतीय दूरसंचार क्षेत्रातील वाढत्या ट्रेंडशी सुसंगत आहे. सध्या एअरटेल ग्राहकांना दीर्घ कालावधीच्या किंवा अधिक प्रीमियम रिचार्जकडे आकर्षित करत आहेत, बहुतेकदा स्ट्रीमिंग सबस्क्रिप्शन किंवा अतिरिक्त भत्ते यासारख्या बंडल सेवांचा त्यामध्ये समावेश केला जातो. 249 रुपयांच्या प्लॅनवर अवलंबून असलेल्या नियमित यूजर्ससाठी, हा बदल परवडणाऱ्या किमतीवर आणखी एक दबाव निर्माण करू शकतात. विशेषतः ज्यांना वचनबद्धतेपेक्षा लवचिकता पसंत आहे त्यांच्यासाठी हा पॅक काढून टाकल्याने डेटा आणि कॉलची आवश्यकता असलेल्या परंतु जास्त काळ किंवा महागड्या पर्यायांसाठी पैसे खर्च करू इच्छित नसलेल्यांचा आता हिरमोड होणार आहे.
जाहिरात
जाहिरात