BSNL युजर्सना आता देणार सेट-टॉप-बॉक्सशिवाय देणार Live TV पाहण्याची सुविधा; पहा काय आहे प्लॅन

Android 10 आणि त्यापुढील टीव्ही चे कस्टमर्स BSNL Live TV app हे Play Store वरून डाऊनलोड करू शकतात

BSNL युजर्सना आता देणार सेट-टॉप-बॉक्सशिवाय देणार Live TV पाहण्याची सुविधा; पहा काय आहे प्लॅन

Photo Credit: BSNL

Android 10 किंवा त्यानंतरचे टीव्ही असलेले ग्राहक प्ले स्टोअरवरून BSNL Live TV ॲप डाउनलोड करू शकतात

महत्वाचे मुद्दे
  • BSNL कडून 500 पेक्षा अधिक चॅनेल्सचं लाईव्ह स्ट्रिमिंग IFTV service द्वारा
  • यामध्ये युजर्सचा FTTH pack हा स्वतंत्र असणार आहे
  • Amazon Prime Video आणि Netflix सारखी OTT platfoms देखील सपोर्ट करणार
जाहिरात

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) कडून भारतामध्ये काही भागात पहिला फायबर बेस्ड इंटरनेट टीव्ही लॉन्च ची घोषणा झाली आहे. ही सेवा IFTV म्हणून ओळखली जाणार आहे. Fibre-to-the-Home च्या सब्सस्क्रायबर्सना सेवा देण्यासाठी IFTV मागील महिन्यात लॉन्च झाला आहे. यासोबतच BSNL चा नवा लोगो आणि सहा अन्य सुविधा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

IFTTV कडून अनेक लाईव्ह चॅनेल्स दिले जाणार आहेत. BSNL च्या सोशल मीडीया अपडेट्स नुआर, या सेवेमध्ये 500 लाईव्ह चॅनेल्स आहेत. तर त्यांच्या अधिकृत वेबसाइटने नमूद केले आहे की 300 हून अधिक चॅनेल केवळ मध्य प्रदेश आणि तामिळनाडूच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. शिवाय, ते Pay TV content देखील ऑफर करेल, रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल द्वारे ऑफर केलेल्या इतर थेट टीव्ही सेवांप्रमाणे, जेथे स्ट्रीमिंगद्वारे वापरला जाणारा डेटा Monthly Quota तून वजा केला जातो, BSNL IFTV च्या बाबतीत असे होणार नाही.

बीएसएनएल च्या माहितीनुसार, टीव्ही स्ट्रिमींग साठी असलेला डाटा हा स्वतंत्र असणार आहे. तो FTTH pack मधून कापला जाणार नाही. त्याच्याऐवजी स्ट्रिमिंग साथी अमर्याद डाटा असणार आहे. लाईव्ह टीव्ही सर्व्हिस हे विशेषतः BSNL FTTH customers साठी अधिकचा दर आकारला जाणार नाही.

BSNL ने पुष्टी केल्यानुसार, लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म आणि स्ट्रीमिंग ॲप्स जसे की Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Netflix, YouTube आणि ZEE5 ला देखील सपोर्ट करणार आहे. याव्यतिरिक्त, ते गेम्स देखील ऑफर करेल. तर बीएसएनएल ऑपरेटर च्या माहितीनुसार, त्यांची IFTV सेवा सध्या फक्त Android TV सह काम करणार आहेत. Android 10 किंवा त्यानंतरचे टीव्ही असलेले ग्राहक Google Play Store.bii वरून BSNL Live TV ॲप डाउनलोड करू शकतात.

कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन (IPTV) सेवा दिल्या आहेत. आता सेवा सुरक्षितपणे, परवडणारी आणि विश्वासार्हपणे प्रदान करणे ही 3 उद्दीष्टं आहेत.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Vodafone Idea ने 5G सेवा 23 नव्या शहरांमध्ये होणार सुरू; प्रीपेड प्लान्स, डेटा स्पीड जाणून घ्या
  2. Moto G96 5G 9 जुलैला भारतात होणार लॉन्च; दमदार फीचर्स आणि स्टायलिश लुकची चर्चा
  3. iQOO 13 Green Edition भारतात लॉन्च होण्याच्या तयारीत; पहा फीचर्स, किंमती काय?
  4. AI+ चे Nova 5G व Pulse स्मार्टफोन भारतात 8 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार
  5. Tecno चा Pova 7 5G स्मार्टफोन 4 जुलैला भारतात लॉन्च; मिळणार AI असिस्टंट आणि आधुनिक UI
  6. Vi चा धमाकेदार फॅमिली प्लॅन: 2 सिम, Netflix आणि Choice Benefits केवळ ₹871 मध्ये
  7. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  8. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  9. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  10. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »