BSNL चा आयपीएल स्पेशल रीचार्ज प्लॅन काय? घ्या जाणून

251 रुपयांच्या STV ची स्वतःची सेवा वैधता नाही आणि त्याला चालण्यासाठी सक्रिय बेस पॅक आवश्यक आहे

BSNL चा आयपीएल स्पेशल रीचार्ज प्लॅन काय? घ्या जाणून

Photo Credit: BSNL

चालू इंडियन प्रीमियर लीग २०२५ हंगामादरम्यान बीएसएनएलचा नवीन प्लॅन आला आहे.

महत्वाचे मुद्दे
  • BSNL कडून Rs. 251 prepaid recharge voucher खास IPL streaming साठी लॉन्च
  • प्लॅनमध्ये 60 दिवसांसाठी 251GB डेटा मिळणार
  • हे एक Special Tariff Voucher आहे ज्यात सेवा वैधता नाही
जाहिरात

Bharat Sanchar Nigam Limited कडून नवा रिचार्ज प्लॅन प्रीपेड मोबाईल युजर्ससाठी देण्यात आला आहे. हा प्लॅन 251 रूपयांचा आहे. हा प्लॅन Special Tariff Voucher म्हणून सादर करण्यात आला आहे. ज्याचा अर्थ यामध्ये active service validity नसेल. बीएसएन एल च्या माहितीनुसार, नवीन प्रीपेड रिचार्ज व्हाउचर देशातील सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2025 च्या प्रेक्षकांना लक्ष्य ठेवून आणला आहे आणि तो डेटा बेनिफिट्स देतो.BSNL च्या Rs. 251 Prepaid Recharge Voucher चे फायदे,बीएसएनएलच्या नवीन STV, ज्याला IPL 251 असे नाव देण्यात आले आहे, त्याची किंमत भारतात 251 रुपये आहे आणि तो 60 दिवसांच्या कालावधीसाठी 251 जीबी पर्यंत डेटा देतो. fair usage policy(FUP) अंतर्गत, ग्राहक मर्यादा संपेपर्यंत अमर्यादित इंटरनेटचा आनंद घेऊ शकतात, त्यानंतर वेग 40 Kbps पर्यंत कमी केला जातो.Rs. 251 STV ची स्वतःची सेवा वैधता नाही. त्यामुळे, त्याला काम करण्यासाठी सक्रिय बेस प्लॅन आवश्यक आहे.

IPL केंद्रित प्रीपेड रिचार्ज प्लॅन सुरू करणारी बीएसएनएल ही एकमेव टेलिकॉम ऑपरेटर नाही. एअरटेल, रिलायन्स जिओ आणि व्होडाफोन आयडिया (Vi)सारख्या त्यांच्या स्पर्धकांनीही डेटा बेनिफिट्ससह पॅक सादर केले आहेत. जिओच्या 100 रुपयांमध्ये 90 दिवसांच्या कालावधीसाठी जिओहॉटस्टारचे मोफत complimentary ad-supported subscription उपलब्ध आहे.

दरम्यान, एअरटेलने जिओहॉटस्टारच्या मोफत सबस्क्रिप्शनसह दोन नवीन क्रिकेट पॅक देखील लाँच केले आहेत. 100 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज पॅकमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 5 जीबी डेटा आणि 30 दिवसांच्या जिओहॉटस्टारचा अॅक्सेस मिळतो. 195 रुपयांच्या प्लॅनमध्ये 15 जीबी डेटा आणि 90 दिवसांच्या ओटीटी स्ट्रीमिंग सेवेचे सबस्क्रिप्शन मिळते.

बीएसएनएलने भोपाळ, चंदीगड, चेन्नई, जयपूर, लखनऊ आणि पटना यासारख्या भारतीय शहरांमध्ये त्यांच्या 5G पायाभूत सुविधांची चाचणी सुरू केल्याच्या वृत्तांदरम्यान ही अपडेट आली आहे. टेलिकॉम ऑपरेटर पुढील तीन महिन्यांत दिल्लीपासून नेटवर्क-अ‍ॅज-अ-सर्व्हिस (NaaS) मॉडेल ऑफर करून त्यांच्या 5G सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Motorola Edge 70 भारतात दाखल; दमदार प्रोसेसर, अल्ट्रा-स्लिम बॉडी खास आकर्षण
  2. लॉन्चपूर्वी समोर आले OnePlus Max चे स्पेसिफिकेशन्स; इथे पहा अपडेट्स
  3. WhatsApp वर वाढणार सिक्युरिटी! ‘Strict Account Settings’ फीचरची चाचणी सुरू
  4. Lava Agni 4 ची किंमत आणि मुख्य फीचर्स लाँचपूर्वीच झाले लीक; इथे पहा अपडेट्स
  5. Motorola चा Moto G67 Power 5G भारतात लॉन्च; मोठी बॅटरी, दमदार कॅमेरा पॉवरने फोन सज्ज
  6. Galaxy A57 मॉडेल नंबर आला समोर, Samsung चा नवीन fमड-रेंज फोन येणार बाजारात
  7. Poco F8 Ultra आण F8 Pro च ग्लोबल लाँच निचत; दमदार परफॉमन्सची अपक्षा
  8. Oppo Reno 15 सिरीज भारतात येण्यासाठी सज्ज; Geekbench वर दिसली झलक
  9. Realme C85 5G आणि Pro 4G लाँच; बॅटरी बॅकअप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार
  10. Vivo चा नवीन Y19s 5G स्मार्टफोन भारतात दाखल, पहा किंमत काय?
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »