Photo Credit: Reuters
रिलायन्स जिओच्या काही निवडक प्रीपेड प्लॅनमध्ये जिओहॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
Reliance Jio कडून काही निवडक प्रिप्रेड रिचार्ज प्लॅन्सवर बेनिफिट्स जाहीर केले आहेत. भारतात आगामी दिवसांत क्रिकेट सेशन सुरू होणार आहे त्यापार्श्वभूमीवर हे अपडेट्स आहेत. 299 रूपये आणि त्यावरील रिचार्ज प्लॅन वर आता जिओ हॉटस्टारचं सब्सस्क्रिप्शन मिळणार आहे. सोबत Jio AirFiber,चं फ्री ट्रायल मिळणार आहे. Jio AirFiber, ही जिओ ची वायरलेस ब्रॉडबॅन्ड सर्व्हिस आहे. ग्राहक आता आगामी आयपीएल हंगामाच्या मॅचेस पाहू शकतील सोबतच सिनेमे, शोज, अॅनिमेशन आणि डॉक्युमेंटरीज देखील मोबाईल आणि टीव्ही वर 4K मध्ये पाहू शकणार आहेत.
रिलायंस जिओ च्या माहितीनुसार, सध्याचे आणि नवे जिओ ग्राहक 90 दिवसांसाठी JioHotstar चं सब्सस्क्रिप्शन घेण्यासाठी 299 रूपये आणि त्यावरील रिचार्ज करू शकतात. याद्वारा 4K streaming मोबाईल आणि टीव्ही वर पाहू शकतील. यासोबतच 50 दिवस JioFiber किंवा Jio AirFiber trial ग्राहकांना मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड वायफाय, 800+ OTT channels आणि 11 पेक्षा जास्त ओटीटी अॅप्स मिळतील.
सध्याचे जिओ युजर्स हे 299 चा प्लॅन रिचार्ज करू शकतात ज्यामध्ये त्यामध्ये त्यांना अनलिमिटेड व्हॉईस कॉल, 1.5GB data आणि 100 एसएमएस प्रतिदिन मिळणार आहेत. सोबतच JioCloud आणि JioTV चा अॅक्सेस दिला जाणार आहे. नवे युजर्स नवं सीम घेऊ शकतील. त्यामध्ये 299 किंवा त्यापेक्षा जास्तीचा देखील प्लॅन घेऊ शकतील. ज्यांना 5जी इंटरनेट अनलिमिटेड हवा आहे त्यांना प्लॅन मध्ये 2 जीबी प्रतिदिन मिळणार आहे.
जिओची ऑफर 17 मार्च ते 31 मार्च असणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ज्यांनी 17 मार्चपूर्वी रिचार्ज केला आहे आणि प्लॅन अॅक्टिव्ह आहे ते 100 रुपयांचा पॅक निवडू शकतात जो सारखेच फायदे देतो. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या सुरुवातीपूर्वी हे प्लॅन सादर करण्यात आले आहेत. टेलिकॉम प्रोव्हायडरनुसार, मोफत जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन सामन्याच्या पहिल्या दिवशी 90 दिवसांच्या कालावधीसाठी सक्रिय केला जाईल.
उल्लेखनीय बाब म्हणजे, जिओ इतर अनेक प्रीपेड रिचार्ज प्लॅन देखील ऑफर करते जे स्ट्रीमिंग सेवेचे मोफत सबस्क्रिप्शन देतात. ग्राहक साराखेच फायदे मिळविण्यासाठी 100 रुपये, 195 रुपये किंवा 949 रुपयांचे रिचार्ज करू शकतात.
जाहिरात
जाहिरात