जुलै महिन्यामध्ये Jio आणि इतर दूरसंचार कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड आणि पोस्टपेड डेटा प्लॅन्सची किंमत वाढविली आहे. 3 जुलै 2024 पासून दूरसंचार कंपनीने वाढवलेल्या किंमती आणि नवीन नियम सुध्दा लागू करण्यात आले आहेत. परंतु याव्यतिरिक्त आता Jio ने पुन्हा त्यांच्या Netflix Subscription प्रदान करणाऱ्या रीचार्जची किंमत वाढवल्याचे समोर येत आहे. महत्वाचे म्हणजे या दोन्ही प्लॅन्सच्या वाढलेल्या किंमती Jio च्या अधिकृत वेबसाईट वर दिसून येत आहेत. हा रिचार्ज 84 दिवसांपर्यंत वैध आहे. चला तर मग पाहूया, Jio ने आपल्या कोणत्या Jio Prepaid Plans ची किंमत वाढविली आहे आणि अन्य कोणत्या रिचार्जमध्ये बदल करण्यात आले आहेत.
Jio चे 1,099 रुपये आणि 1,499 रुपये किंमतीचे दोन रिचार्ज यापूर्वी उपलब्ध होते, जे आपल्या ठराविक योजनेसोबतच Netflix ची सदस्यता मोफत देत असत. पण आता या दोन्ही रिचार्ज च्या किंमती मध्ये कंपनीकडून बदल करण्यात आलेला आहे. यापूर्वी 1,099 रुपयांमध्ये उपलब्ध असलेला रिचार्ज आता 1,299 रुपयांमध्ये तर 1,499 रुपयांचा रिचार्ज आता 1,799 रुपयांमध्ये उपलब्ध असल्याचे Jio च्या अधिकृत वेबसाईट वर सूचीबद्ध करण्यात आले आहे. 1,299 रुपयांचा प्लॅन हा नेटफ्लिक्स मोबाइल सबस्क्रिप्शन प्रदान करतो आणि 1,799 रुपयांचा नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शन आणि इतर फायदे देखील प्रदान करतो.
1,299 रुपयांमध्ये, वापरकर्त्यांना तीन महिन्यांसाठी 480 पिक्सेल रिझोल्यूशनवर एकाच मोबाइल डिव्हाइस किंवा टॅब्लेटवर Netflix Subscription मोफत दिले जाणार आहे. या प्लॅनची वैधता 84 दिवस इतकी आहे त्यासोबतच अमर्यादित कॉल्स आणि 100 SMS सोबत प्रतिदिन 2GB दैनंदिन डेटा प्रदान करतो. याव्यतिरिक्त, या रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना JioCinema, JioCloud आणि JioTV वर देखील प्रवेश मिळणार आहे.
Jio या नवीन रिचार्ज प्लॅन मध्ये 1,299 रुपयांमध्ये, वापरकर्त्यांना तीन महिन्यांसाठी 480 पिक्सेल रिझोल्यूशनवर एकाच मोबाइल डिव्हाइस किंवा टॅब्लेटवर Netflix सामग्रीचा प्रवेश मिळेल. याची वैधता 84 दिवस आहे आणि अमर्यादित कॉल्स आणि 100 SMS प्रतिदिन 2GB दैनंदिन डेटा ऑफर करते. याव्यतिरिक्त, त्यांना JioCinema, JioCloud आणि JioTV वर देखील प्रवेश मिळेल. तसेच, 1,799 रुपयांमध्ये उपलब्ध असणारा Jio Prepaid Plan हा 720p पर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंग गुणवत्तेसह स्मार्टफोन, टॅबलेट, स्मार्ट टीव्ही आणि लॅपटॉप अशा विविध उपकरणांवर Netflix सामग्री प्रदान करतो. हा Jio Prepaid Plan अमर्यादित कॉलिंग, दररोज 3GB डेटा आणि दररोज 100 SMS देखील प्रदान करतो ज्याची वैधता 84 दिवस आहे.