Complimentary JioHotstar Subscription हे 90 दिवसांसाठी वैध असणार आहे.
Photo Credit: JIO
रिलायन्स जिओच्या काही योजनांमध्ये जिओहॉटस्टारचे मोफत जाहिरात-समर्थित सबस्क्रिप्शन दिले जाते.
Reliance Jio कडून नवा रिचार्ज प्लॅन हा prepaid users साठी जारी करण्यात आला आहे. याच्या माध्यमातून युजर्सना अगदी किफायतशीर दरामध्ये JioHotstar या नव्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कंटेंट पाहता येणार आहे. यामध्ये JioHotstar subscription हे complimentary मिळणार आहे. प्लॅनच्या बेनिफिट्स मध्येच subscription असणार आहे. JioCinema आणि Disney+ Hotstar ने एकत्र येत नुकतीच JioHotstar हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे. या प्लॅनमध्ये Reliance Jio युजर्सना जाहिराती असलेला कंटेंट मोफत पाहता येणार आहे. यासाठी कोणताही मासिक किंवा वार्षिक प्लॅन घेण्याची गरज नाही.
Reliance Jio च्या युजर्सना आता JioHotstar चा complimentary access मिळणार आहे. हा पर्याय काही विशिष्ट प्रिपेड रिचार्ज वर असणार आहे. Rs. 100 prepaid recharge plan मध्ये मोबाईल युजर्सना complimentary ad-supported subscription मिळणार आहे. हे 90 दिवसांसाठी असणार आहे.
प्लॅनची व्हॅलिडिटी 90 दिवस असणार आहे पण फक्त डेटा बेनिफीट्स मिळतील. ग्राहकांना 5 जीबी high-speed internet मिळणार आहे. प्लॅनमधील डेटा संपल्यानंतर डाऊनलोड स्पीड कमी होऊन 64kbps होईल. complimentary JioHotstar subscription हे टीव्ही आणि मोबाईल दोन्हींवर चालणार आहे.
JioHotstar चा जाहिरात असलेला प्लॅन 149 रूपये प्रति महिना असा सुरू होत आहे. यामध्ये कंटेंट एका मोबाईल डिव्हाईस वर पाहता येतो. जो 720p resolution आहे. JioHotstar चा सर्वात अव्वल Premium plan देखील 299 रूपये प्रति महिना, 1499 वार्षिक असा आहे. टेलिकॉम प्रोव्हायडर कडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, यामध्ये 3 लाख तासांचे सिनेमे, शोज, अॅनिमेशन्स, डॉक्युमेंटरीज आहेत सोबतच काही लाईव्ह स्पोर्टस कव्हरेज देखील आहेत.
ज्यांना जास्त डेटा असलेले जास्त किमतीचे प्लॅन निवडायचे आहेत ते 195 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनने रिचार्ज करू शकतात. क्रिकेट डेटा पॅक म्हणून सादर करण्यात आलेल्या या प्लॅनमध्ये 15 जीबी हाय-स्पीड इंटरनेटचा समावेश आहे, तर इतर फायदे तसेच आहेत. आणि जर व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस देखील तुमच्या गरजा असतील, तर 949 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. तो एकूण 90 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉल, दररोज 100 एसएमएस आणि दररोज 2 जीबी डेटा देतो.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy S26, Galaxy S26+ and Galaxy S26 Ultra Will Reportedly Go on Sale in March